रितेश देशमुखचं मराठा मोर्चाबाबत मध्यरात्री हटके ट्विट!

राज्यसह देशभरात मराठा मोर्चाची चर्चा सुरु असताना, अभिनेता रितेश देशमुखनेही अनोखं ट्विट केलं आहे.

रितेश देशमुखचं मराठा मोर्चाबाबत मध्यरात्री हटके ट्विट!

मुंबई: राज्यसह देशभरात मराठा मोर्चाची चर्चा सुरु असताना, अभिनेता रितेश देशमुखनेही अनोखं ट्विट केलं आहे.

रितेश देशमुखने रात्री 12 वाजून 19 मिनिटांनी मुंबईतील मराठा मोर्चाबाबत ट्विट केलं.

एक मराठा लाख मराठा #मराठाक्रांतीमोर्चा #मुंबई  असं म्हणत रितेश देशमुखने शिवाजी महाराजांचा फोटो ट्विट केला आहे.

https://twitter.com/Riteishd/status/894993865039654913

दरम्यान मुंबईत आज मराठा मोर्चा होत आहे. राज्यभरातील मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चेकरांना रितेश देशमुखने ट्विटदारे आपला पाठिंबा दर्शवल्याचं चित्र आहे.

रितेश देशमुखचा शिवाजी

अवघ्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनावर लवकरच मराठी सिनेमा बनणार आहे. अभिनेत्री जेनेलिया डिसूजाची निर्मिती असलेल्या ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

जेनेलिया आणि मुंबई फिल्म कंपनीची निर्मिती असलेल्या ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटात रितेश देशमुखच शिवाजी महाराजांची चरित्र भूमिका साकारणार आहे.

 रितेश देशमुख लवकरच बिग बजेट छत्रपती शिवाजी हा सिनेमा घेऊन येणार आहे. या सिनेमाचं बजेट हे बाहुबली सिनेमाच्या तोडीचं असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

बाहुबलीनंतर रितेशचा भव्यदिव्य 'शिवाजी', राम गोपाल वर्मांकडून ट्विटरवरुन कौतुक 

छत्रपती शिवाजी, जेनेलियाची निर्मिती, रवी जाधव दिग्दर्शक

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV