पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, मुंबईतील 11 जणांचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, मुंबईतील 11 जणांचा मृत्यू

पुणे: पुणे-सोलापूर एक्सप्रेस रोडवर ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या भीषण अपघातात 11 प्रवासी ठार झाले आहेत. हे सर्व प्रवासी मुंबईच्या मुलुंड भागातले होते. अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.

उरुळीच्या कांचनाजवळच्या इमामदार वस्तीजवळ सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. पुण्याहून सोलापूरला जाणाऱ्या ज्योती ट्रॅव्हलसमोर रानडुक्कर आडवं गेलं. त्यानंतर चालकाचा ताबा सुटल्यानं बस थेट दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळली.

या अपघातात ट्रॅव्हल्समधील 11 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये 5 महिला आणि 5 पुरुष आणि एका चौदा वर्षीय मुलीचा समावेश आहे. दरम्यान, अपघातातील जखमींना उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV