मुलींना छेडणाऱ्या टवाळखोराची पोलिसालाच मारहाण

आपण राज्य शासनाच्या व्हिजिलन्स विभागात कामाला आहोत, असे या इसमाचे म्हणणे होते. स्वच्छतागृहाजवळ येणाऱ्या तरुणींकडे हा इसम मोबाईल क्रमांक मागत असे आणि त्यांना मी तुम्हाला जॉबला लावतो असे सांगून त्रास देत असे.

मुलींना छेडणाऱ्या टवाळखोराची पोलिसालाच मारहाण

मुंबई : मुंबईमध्ये पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांना रोखले म्हणून पोलिसावरच या टवाळखोरांनी हात उचलल्याची घटना मुलुंडमध्ये घडली.

मुलुंडमध्ये आज महिला स्वछतागृहाजवळ उभे राहून मुलींना त्रास देणाऱ्या इसमाला जाब विचारण्यास आलेल्या मुलीच्या नातेवाईकांच्या मध्ये एका वाहतूक पोलिसाने हस्तक्षेप केला असता, या वाहतूक पोलिसालाच या छेडछाड करणाऱ्या इसमाने मारहाण केली.

आपण राज्य शासनाच्या व्हिजिलन्स विभागात कामाला आहोत, असे या इसमाचे म्हणणे होते. स्वच्छतागृहाजवळ येणाऱ्या तरुणींकडे हा इसम मोबाईल क्रमांक मागत असे आणि त्यांना मी तुम्हाला जॉबला लावतो असे सांगून त्रास देत असे.

एका तरुणीला हा इसम त्रास देत असताना, तिचे नातेवाईक त्याला जाब विचारण्यास आले होते. या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी कर्तव्यावर असलेले विलास कांबळी यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु अचानक या इसमाने विलास कांबळी यांनाच मारहाण करीत अश्लील शिव्या देण्यास सुरुवात केली.

दरम्यान, या इसमाला अखेर मुलुंड पोलीस ठाण्यात पोलिसांनी नेले आणि तिथे त्याच्यावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Roadromeo beats to police in mulund latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV