स्वस्तात बुलेट खरेदीची संधी, रॉयल एन्फिल्डची नवी ऑफर

नव्याऐवजी जुनी पण विश्वासू आणि खात्रीलायक बुलेट तुम्हाला योग्य किमतीत मिळू शकणार आहे.

स्वस्तात बुलेट खरेदीची संधी, रॉयल एन्फिल्डची नवी ऑफर

मुंबई: तुम्ही जर बुलेटप्रेमी असाल, पण बुलेटचं बजेट तुम्हाला परवडत नसेल, तर तुमच्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. नव्याऐवजी जुनी पण विश्वासू आणि खात्रीलायक बुलेट तुम्हाला योग्य किमतीत मिळू शकणार आहे.

बुलेटची वाढती मागणी आणि किंमत यामुळे स्वत: रॉयल एन्फिल्ड कंपनीनेच जुन्या बुलेट विकण्यासाठी स्टोअर्स सुरु केले आहेत. ज्यामध्ये कमी किमतीत बुलेट उपलब्ध असतील.रॉयल एनफिल्डने जुन्या दुचाकी विक्री व्यवसायात पाऊल ठेवलं आहे.  कंपनीने जुन्या बुलेट विकण्यासाठी सुरु केलेल्या स्टोअरला ‘विंटेज स्टोअर’ असं नाव दिलं आहे.

कंपनीने आपलं पहिलं स्टोअर चेन्नईत सुरु केलं आहे. आता देशभरात त्याचा विस्तार केला जाणार आहे.विंटेज स्टोअर ही एक नवी संकल्पना आहे. ज्यामध्ये वापरलेल्या महागड्या गाड्या नव्या रुपात आणल्या जातील, असं कंपनीने म्हटलं आहे.

92 पातळ्यांवर गुणवत्ता चाचणी

या विंटेज स्टोअरमध्ये केवळ रॉयल एन्फिल्डचीच विक्री होईल. शिवाय जुन्या गाड्या खरेदी करण्यासाठी कर्जाची सुविधाही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. इतकंच नाही तर गाडीचा विमा आणि विक्रीनंतर ज्या सुविधा नव्या गाड्यांना दिल्या जातात, त्या सुविधा दिल्या जाणार आहेत.महत्त्वाचं म्हणजे या गाड्यांची क्वालिटी टेस्ट अर्थात गुणवत्ता चाचणी होईल. प्रत्येक बाईक 92 पातळ्यांवर तपासली जाईल. या स्टोअरमधून कोणतीही बाईक घेताना ग्राहकांना विश्वास वाटायला हवा, असं कंपनीचं म्हणणं आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Royal Enfield opens Pre-Owned Motorcycle Store In Chennai
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV