आरपीएफ जवानाने लोकलमधून पडणाऱ्या चिमुरड्याला वाचवलं

RPF जवान सुनील नापा यांनी तातडीने चिमुरड्याच्या दिशेने धाव घेऊन त्याला धरलं, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता.

आरपीएफ जवानाने लोकलमधून पडणाऱ्या चिमुरड्याला वाचवलं

मुंबई : आरपीएफच्या जवानाने स्वतःचा जीव धोक्यात घालून धावत्या लोकलखाली येणाऱ्या चिमुरड्याचे प्राण वाचवले. मुंबईत पश्चिम रेल्वेवरील नायगाव स्टेशनवर ही घटना घडली. शुक्रवारी झालेला हा प्रकार स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

धावत्या लोकलमधून उतरणारा चिमुरडा ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत पडणार होता. त्यामुळे आरपीएफ जवान सुनील नापा यांनी धावत जाऊन त्याला पकडलं, असं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

सात वर्षांचा मुलगा आईसोबत स्टेशनवर आला होता. ट्रेन थांबली असताना दोघांनी ट्रेनमध्ये चढण्याचा निर्णय घेतला. महिला आधी चढली, मात्र मुलगा आत शिरेपर्यंत ट्रेन सुरु झाली. त्यामुळे चिमुरड्याचा पाय घसरला.

सुनील नापा यांनी तातडीने त्याच्या दिशेने धाव घेऊन त्याला धरलं, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: RPF constable saves boy from falling under local train in Mumbai latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV