रायन इंटरनॅशनलच्या संचालकांना मुंबई हायकोर्टाचा अंतरिम दिलासा

काही तांत्रिक अडचणींमुळे रायन पिंटो यांच्या नावाचा अटकपूर्व जामीन उशिरानं दाखल झाला. मात्र प्रकरण एकच असल्यानं हा दिलासा संपूर्ण पिंटो कुटुंबासाठी लागू होईल असं हायकोर्टानं स्पष्ट केलं.

Ryan International School murder : Bombay High Court grants interim relief to trustees Pinto Family latest update

मुंबई : रायन इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ऑगस्टीन पिंटो, त्यांच्या पत्नी आणि व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो यांच्यासह मुलगा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रायन पिंटो यांना मुंबई हायकोर्टानं तात्पुरता दिलासा दिला आहे. पिंटो कुटुंबीयांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी पिंटो कुटुंबीयांना बुधवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत.

काही तांत्रिक अडचणींमुळे रायन पिंटो यांच्या नावाचा अटकपूर्व जामीन उशिरानं दाखल झाला. मात्र प्रकरण एकच असल्यानं हा दिलासा संपूर्ण पिंटो कुटुंबासाठी लागू होईल असं हायकोर्टानं स्पष्ट केलं. गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीतील एका मुलाचा निर्दयपणे खून करण्यात आला. हत्येआधी या मुलावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली अटकेत असलेल्या आरोपीनं दिली आहे. या प्रकरणी गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईतील रायन स्कूलचीही पोलखोल, गेटसमोर दारुच्या बाटल्या

राज्य सरकारच्या विनंतीवरुन हायकोर्टानं ही सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली आहे. या प्रकरणी हरियाणा कोर्टाची बाजू ऐकून घेणंही गरजेचं असल्याचा दावा राज्य सरकारच्या वतीनं हायकोर्टात करण्यात आला. सुप्रीम कोर्टानं हे सिद्ध करण्यासाठी त्यांना बुधवारपर्यंतची मुदत देण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.

कर्नाटकच्या पिंटो यांनी मुंबई, दिल्ली कशी काबीज केली?

हायकोर्टानं ही विनंती मान्य केली खरी मात्र मुळात हे प्रकरण हरियाणाच्या कोर्टात सुरु आहे. याचिकाकर्त्यांनी तिथं हजर होण्यापर्यंतच्याच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे त्यांना तिथे हजर होणं भाग आहे. तिथलं कोर्ट तिथल्या राज्य सरकारची बाजू ऐकून निर्णय घेईल. यात मुंबई उच्च न्यायालयात हरियाणा सरकारची बाजू एकून घेण्याची गरज नाही.

प्रद्युम्न हत्या : वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची हरियाणा सरकार, शाळेला नोटीस

दरम्यान याप्रकरणी एका पालक संघटनेच्या वतीनं अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी या अटकपूर्व जामिनाला विरोध करणारी याचिका दाखल करण्याची परवानगी हायकोर्टाकडे मागितली. मात्र त्यास स्पष्ट नकार देत हायकोर्टानं त्यांना हरियाणाच्या कोर्टात जाण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रद्युम्नची गळा चिरुन हत्या

गुरुग्राममध्ये शुक्रवारी सकाळी सात वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूर या मुलाची शाळेच्याच बस कंडक्टरने गळा चिरुन हत्या केली. हत्येपूर्वी बस कंडक्टरने प्रद्युम्नच्या लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला होता. आरोपी कंडक्टर अशोक कुमारने हत्येची कबुली दिली आहे.

उत्तर विभागात रायन इंटरनॅशलनच्या 23 शाळा आहेत. त्यापैकी दिल्ली एनसीआरमधील 11 शाळांचा समावेश आहे.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Ryan International School murder : Bombay High Court grants interim relief to trustees Pinto Family latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नवजात बालकांना लाखो रुपयांना विकणारी महिला अटकेत
नवजात बालकांना लाखो रुपयांना विकणारी महिला अटकेत

मुंबई : गरीब कुटुंबातील लहान मुलांना अवघ्या काही हजारात विकत घेऊन

शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळावा नवीन दिशा देणारा असतो : आदित्य ठाकरे
शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळावा नवीन दिशा देणारा असतो : आदित्य ठाकरे

डोंबिवली : शिवसेनेचा प्रत्येकच दसरा मेळावा हा नवीन दिशा देणारा

सत्तेतून बाहेर पडू नका, मराठवाड्यातील सेना आमदार उद्धव ठाकरेंना विनंती करणार
सत्तेतून बाहेर पडू नका, मराठवाड्यातील सेना आमदार उद्धव ठाकरेंना...

मुंबई : मराठवाड्यातील शिवसेना आमदार उद्या शिवसेना पक्षप्रमुख

शिवसेनेचं पोस्टर, नारायण राणेंवर विखारी टीका
शिवसेनेचं पोस्टर, नारायण राणेंवर विखारी टीका

मुंबई: नारायण राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशावरुन शिवसेने आक्रमक

एक 'शोधयात्रा' थांबली, ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांचं निधन
एक 'शोधयात्रा' थांबली, ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध साहित्यिक अरुण साधू यांचं

ही चूक पुन्हा होता कामा नये, मुख्यमंत्र्यांची मुंबई विद्यापीठाला सक्त ताकीद
ही चूक पुन्हा होता कामा नये, मुख्यमंत्र्यांची मुंबई विद्यापीठाला...

मुंबई : मुंबई विद्यापीठाने निकालाच्या बाबतीत यंदा कोर्टालाच तारीख

शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकारला धोका नाही : रामदास आठवले
शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकारला धोका नाही : रामदास आठवले

मुंबई : शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडू नये आणि जरी शिवसेना बाहेर

55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग, 62 वर्षीय वृद्धाला तुरुंगवास
55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग, 62 वर्षीय वृद्धाला तुरुंगवास

मुंबई : 55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करणाऱ्या 62 वर्षीय वृद्धाला

रत्नागिरीच्या तरुण-तरुणीची बदलापूरमध्ये रेल्वेखाली आत्महत्या
रत्नागिरीच्या तरुण-तरुणीची बदलापूरमध्ये रेल्वेखाली आत्महत्या

कल्याण : कल्याणजवळच्या बदलापूरमध्ये एक तरुण आणि तरुणीने

मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वेमार्गांवर आज ट्रॅकची