'क्रिकेट खेळणं माझ्यासाठी मंदिरात जाण्यासारखं,' सचिनच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज

'क्रिकेट खेळणं माझ्यासाठी मंदिरात जाण्यासारखं,' सचिनच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर बेतलेला “सचिन: अ बिलियन ड्रीम्स” या सिनेमाच्या ट्रेलर आज रिलीज झाला. कालच या सिनेमाचं एक पोस्टरही लाँच करण्यात आलं होतं. त्यानंतर आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला गेला.

या ट्रेलरमधील सचिनची काही वाक्यं अक्षरश: मनाचा ठाव घेणारी आहेत. 'क्रिकेट खेळणं हे माझ्यासाठी मंदिरात जाण्यासारखं होतं.' असं म्हणत सचिननं या ट्रेलरमध्ये आपली क्रिकेटविषयी असणारी भावना व्यक्त केली आहे.

या सिनेमात खुद्द सचिन तेंडुलकरनं भूमिका साकारली आहे. हा सिनेमा वास्तवावर बेतलेला असल्यानं याचा ट्रेलरही तसाच करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. यात सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांची काही जुनी दृश्यही दाखवण्यात आली आहे.काही वेळापूर्वीच सचिननं स्वत: ट्विटरवरून सिनेमाचा ट्रेलर ट्विट केला आहे. अवघ्या काही मिनिटातच हजारो जणांनी सचिनचा हा ट्वीट लाईक आणि रिट्वीट केला आहे.

या सिनेमात सचिननं स्वतःच काम केलं आहे. त्यामुळे सिनेमाची उत्सुकता सचिनच्या चाहत्यांमध्ये कमालीची आहे. 26 मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV