ठाण्यातील शिक्षकांच्या पगारांची ‘टीजेएसबी’तील खाती बंद

इतक्या वर्षांपासून सेवा पुरवणाऱ्या ‘टीडीसीसीबी’ला कोणतीही पूर्वसूचना व नोटीस न देताच निर्णय घेतल्याने तो नैसर्गिक न्यायतत्त्वांचा भंग करणारा आहे’, असे गंभीर निरीक्षण खंडपीठाने आपल्या निकालात नमूद केले.

ठाण्यातील शिक्षकांच्या पगारांची ‘टीजेएसबी’तील खाती बंद

मुंबई : 'मुंबई बँके'मुळे जोरदार झटका बसलेल्या राज्य सरकारला पुन्हा एकदा हायकोर्टाचा दणका बसला आहे. ठाण्यातील शिक्षकांच्या पगारासंदर्भात ठाणे जनता सहकारी बँकेची (टीजेएसबी) बेकायदेशीर निवड केल्याबद्दलही मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं आहे.

शालेय शिक्षण विभागाने कोणत्याही ठोस कारणाविना आणि नैसर्गिक न्यायाचा भंग करत हा निर्णय घेतला असल्याने तो बेकायदा आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने 14 जून 2017 चा ‘जीआर’ रद्दबातल ठरवला.

ठाणे जिल्ह्यातील मान्यताप्राप्त खासगी आणि अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते 1973 सालापासून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत (टीडीसीसीबी) देण्यात येत होते. मात्र, सरकारची आर्थिक बचत होण्याचा उद्देश म्हणून शालेय शिक्षण विभागाने या बँकेकडून ही सेवा काढून घेत ‘टीजेएसबी’ला देण्याचा निर्णय घेतला.

त्याप्रमाणे ‘टीजेएसबी’च्या ठाण्यातील शाखेत ‘मेन पुल अकाऊंट’ उघडण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. त्याविरोधात ‘टीडीसीसीबी’ने हायकोर्टात याचिका दाखल केली. त्याचबरोबर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व बहुजन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संसदनेही स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिले.

याविषयीच्या अंतिम सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकताना खंडपीठाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निर्णयासंदर्भातील मूळ फाईलही मागवून घेतली होती. ‘शिक्षणमंत्र्यांनी संबंधित शिक्षण अधिकारी आणि अर्थ विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा न करताच निर्णय घेतल्याचे फाईलवरुन दिसते. त्याचबरोबर इतक्या वर्षांपासून सेवा पुरवणाऱ्या ‘टीडीसीसीबी’ला कोणतीही पूर्वसूचना व नोटीस न देताच निर्णय घेतल्याने तो नैसर्गिक न्यायतत्त्वांचा भंग करणारा आहे’, असे गंभीर निरीक्षण खंडपीठाने आपल्या निकालात नमूद केले.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Salary accounts of Teachers in TJSB Bank in Thane closed by Mumbai High court latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV