सलमानच्या बर्थडेला कतरिनाचं गिफ्ट, पार्टीला धोनीची हजेरी

बॉलिवूडचा टायगर अर्थात अभिनेता सलमान खान आज 52 वर्षांचा होत आहे. वाढदिनी सलमानवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सलमानच्या बर्थडेला कतरिनाचं गिफ्ट, पार्टीला धोनीची हजेरी

मुंबई: बॉलिवूडचा टायगर अर्थात अभिनेता सलमान खान आज 52 वर्षांचा होत आहे. वाढदिनी सलमानवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सलमानसाठी डबल सेलिब्रेशनचा दिवस आहे. कारण त्याच्या ‘टायगर जिंदा है’ने अवघ्या 4 दिवसात 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. त्यामुळे सलमान खुश आहे.

या सिनेमात कतरिना कैफही मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळेच सलमानने या सिनेमाच्या यशाचं श्रेय कतरिनाला दिलं आहे.

त्यामुळेच सलमान म्हणतो, “कतरिनाने मला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून ‘टायगर जिंदा है’चं यश दिलं आहे”.

सलमानच्या बर्थ डे धोनी

सलमानच्या बर्थ डे पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सलमानच्या संपूर्ण कुटुंबाशिवाय अभिनेत्री संगिता बिजलानी, लुलीया वंतूर, कतरिना कैफ, मौनी रॉय, डेजी शाह, सोनाक्षी सिन्हा, साजिद नाडियावाला, अनिल कपूर, बॉबी देओल, बाबा आजमी, प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते.

याशिवाय टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी अर्ध्या रात्री सलमानच्या पनवेलच्या फार्महाऊसवर पोहोचला.

त्याआधी धोनी विराट आणि अनुष्काच्या रिसेप्शन पार्टीला हजर राहिला होता. लोअर परेलवरुन तो पनवेलला गेला.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Salman Khan birth day party, Dhoni, katrina kaif present
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV