शेअर बाजारात घसरण सुरुच, 500 अंकांनी सेन्सेक्स गडगडला

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सलग तिसऱ्या दिवशीही शेअर बाजारात घसरण सुरु असल्याचं दिसून येत आहे.

शेअर बाजारात घसरण सुरुच, 500 अंकांनी सेन्सेक्स गडगडला

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सलग तिसऱ्या दिवशीही शेअर बाजारात घसरण सुरु आहे. नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली नाही. आतापर्यंत सेन्सेक्स तब्बल 500 अंकानी घसरला आहे.

बाजार सुरु होताच सेन्सेक्समध्ये 347.9 अकांची घसरण पाहायला मिळाली. तर निफ्टी देखील 156 अंकांनी गडगडला. त्यामुळे सध्या बाजारात मंदीचं वातावरण दिसून येत आहे.

दरम्यान, बाजार सुरु होण्यापूर्वीचे कल देखील घसरणीमध्येच पाहायला मिळाले. दुसरीकडे बँक निफ्टी 1.15 टक्के घसरला आहे. तर आर्थिक सेवामध्येही 1.6 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे.

निफ्टीतील 50 पैकी फक्त 14 शेअर तेजीत आहेत. तर बाकी 36 शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे.
सर्वाधिक घसरण झालेले शेअर :

एचडीएफसी 3.5 टक्के

इंडसइंड बँक 2.3 टक्के

एलअॅण्डटी 2.48 टक्के

बजाज फायनान्स 2.39 टक्के

अदानी पोर्ट्स 2.20 टक्के

संबंधित बातम्या :

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठी घसरण

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: sensex slips below 35000 stock market continued to fall latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV