अकरावी प्रवेश : इंटिग्रेटेड कॉलेजबाबत शिक्षण विभागाचा महत्त्वाचा इशारा

इंटिग्रेटेड कॉलेजमधील प्रवेशाबाबत शिक्षण विभागाने अकरावीच्या विद्यार्थ्यांना सतर्क केले आहे.

By: | Last Updated: > Monday, 17 July 2017 8:42 PM
SESD requested to Parents & Students for not take admission in so called integrated Jr College latest updates

मुंबई : इंटिग्रेटेड कॉलेजमधील प्रवेशाबाबत शिक्षण विभागाने अकरावीच्या विद्यार्थ्यांना सतर्क केले आहे. मुंबई विभागातील तथाकथित इंटिग्रेटेड ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश न घेण्याची विनंती शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना केली आहे.

शिक्षण विभागाने काय म्हटले आहे?

“पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की, मुंबई विभागातील कोणत्याही तथाकथित इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन नये. जर तुम्ही अशा कॉलेजमध्ये प्रवेश घेतलात आणि भविष्यात कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या, तर त्याला शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही.”, असं स्पष्ट शब्दात शालेय शिक्षण आणि क्रीड विभागाने आपल्या वेबसाईटवर सूचना दिली आहे.

Notice

इंटिग्रेटेड कॉलेज म्हणजे काय?

अकरावीच्या प्रवेशासाठी ज्या इंटेग्रेटेड कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात, त्या कॉलेजमध्ये त्यांना कॉलेजसोबत कोचिंग क्लासमध्येही प्रवेश घेता येतो. म्हणजे क्लास आणि कॉलेज हे एकच असतं किंवा काही कॉलेज कोणत्यातरी कोचिंग क्लाससोबत जोडलेले असतात. त्यामुळे या कॉलेजमुळे विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये पूर्ण वेळ देता येतो. कारण या कॉलेजला रोज हजर राहणे बंधनकारक नसतं.

इंटिग्रेटेड कॉलेज बंद करा : युवासेना

युवासेनेने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत इंटिग्रेटेड कॉलेजचे स्टिंग करुन इंटिग्रेटेड कॉलेजची चौकशी करावी आणि असे कॉलेज बंद करण्याची कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे. यासंदर्भात युवासेनेने शिक्षण उपसंचलक बी. बी. चव्हाण यांना निवेदन दिले.

इंटिग्रेटेड कॉलेजची माहिती काढण्याचे काम सुरु

इंटिग्रेटेड कॉलेजची माहिती काढण्याचे काम सुरु असून, अशा कॉलेजची चौकशी शिक्षण विभाकडून करण्यात येईल. तसेच सर्व ज्युनियर कॉलेजमध्ये ऑनलाईन प्रवेश मार्गदर्शक पुस्तिकेत दर्शविल्याप्रमाणेच फी आकारली जावी, असे आदेशही शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिले आहे.

पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतले आहेत. आता दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने आधीच इंटिग्रेटेड कॉलेजच्या सूचना देणे गरजेचे होते. मात्र, पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर शिक्षण विभागाला तथाकथित इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये प्रवेश न घेण्याची विनंती करण्यासाठी जाग आल्याचे दिसून येते आहे.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:SESD requested to Parents & Students for not take admission in so called integrated Jr College latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

VIDEO : मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर नारळाचं झाड कोसळलं
VIDEO : मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर नारळाचं झाड कोसळलं

मुंबई : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या अंगावर

नागपंचमीला जिवंत सापांची पूजा करण्यावर बंदी कायम
नागपंचमीला जिवंत सापांची पूजा करण्यावर बंदी कायम

मुंबई : श्रावण महिना येताच सणांची रेलचेल सुरु होते. यात पहिला सण

मुंबई महापालिकेकडून 193 अनधिकृत शाळा जाहीर
मुंबई महापालिकेकडून 193 अनधिकृत शाळा जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागानं अनधिकृत शाळांची यादी

मुसळधार पावसानंतर मुंबई, ठाणे परिसरात साथीच्या आजारांचं थैमान
मुसळधार पावसानंतर मुंबई, ठाणे परिसरात साथीच्या आजारांचं थैमान

ठाणे/ मिरा-भाईंदर : राज्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत

तावडे-शेलारांनी विरोधी पक्षातील मराठा आमदार मॅनेज केले?
तावडे-शेलारांनी विरोधी पक्षातील मराठा आमदार मॅनेज केले?

मुंबई: राष्ट्रपती निवडणुकीत विरोधीपक्षाचे आमदार फोडण्यात भाजप

कॉलेजच्या बाथरुमध्ये विद्यार्थिंनीचे व्हिडीओ काढण्याचे प्रयत्न, शिपायाला अटक
कॉलेजच्या बाथरुमध्ये विद्यार्थिंनीचे व्हिडीओ काढण्याचे प्रयत्न,...

मुंबई : विद्येचं मंदिर समजल्या जाणाऱ्या कॉलेजांमध्येही

बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर तीन दिवस जमावबंदी
बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर तीन दिवस जमावबंदी

बदलापूर: बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर तीन दिवसांसाठी जमावबंदी

धबधब्यात बाहुबली स्टाईल उडी मारण्याच्या नादात जीव गेला
धबधब्यात बाहुबली स्टाईल उडी मारण्याच्या नादात जीव गेला

कल्याण: बाहुबली सिनेमात प्रभासनं जशी धबधब्यावरून उडी मारली, तशी उडी

बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

मुंबई: मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू सुरु करण्यात

सॅनिटरी पॅडला जीएसटीतून वगळा, हायकोर्टात याचिका
सॅनिटरी पॅडला जीएसटीतून वगळा, हायकोर्टात याचिका

मुंबई: सॅनिटरी पॅडला जीएसटीतून वगळण्यात यावं, अशी मागणी करत मुंबई