डहाणूत भाजपला धक्का, सात नगरसेवकांची राष्ट्रवादीत घरवापसी

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले माजी नगराध्यक्ष आणि सहा ते सात नगरसेवकांची घरवापसी झाली आहे.

डहाणूत भाजपला धक्का, सात नगरसेवकांची राष्ट्रवादीत घरवापसी

डहाणू : डहाणूमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण की, काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले माजी नगराध्यक्ष आणि सहा ते सात नगरसेवकांची घरवापसी झाली आहे.

माजी नगराध्यक्ष मिहिर शाह यांच्यासह 6 ते 7  नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. मात्र, अवघ्या दोनच महिन्यात त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये पुन्हा प्रवेश केला.

दरम्यान, डहाणू नगरपरिषद उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच या सातही नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्यानं भाजपला मोठा धक्का बसला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Seven corporators left the BJP and join NCP in Dahanu latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV