अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठी घसरण

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज (शुक्रवार) शेअर बाजार गडगडला. सेन्सेक्स 840 अंशांनी खाली घसरला असून निफ्टीमध्येही 250 अंकांची घसरण झाली आहे.

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठी घसरण

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज (शुक्रवार) शेअर बाजार गडगडला. सेन्सेक्स 840 अंशांनी खाली घसरला असून निफ्टीमध्येही 250 अंकांची घसरण झाली आहे.

काल (बुधवार) अर्थसंकल्प सादर करताना भांडवली बाजारातील व्यवहारातून १ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेवर होणाऱ्या लाभावर १० टक्के कर प्रस्तावित करण्याची घोषणा केली. त्यानंतर आज ही पडझड बघायला मिळाली.

या शिवाय सिंगापूर आणि आशियातील अन्य शेअर मार्केटमध्ये झालेली घसरण, याचा परिणामही शेअर बाजारावर दिसून आला. अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एल अँड टी, कोटक महिंद्रा आदींच्या शेअरच्या दरात घसरण झाली आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Share market crashed after budget latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV