चॉकलेट हिरो काळाच्या पडद्याआड, शशी कपूर यांचं निधन

वयाच्या 79 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे शशी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.

चॉकलेट हिरो काळाच्या पडद्याआड, शशी कपूर यांचं निधन

मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 79 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे शशी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही काळापासून शशी कपूर यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली.

शशी कपूर यांचा जन्म 1938 मध्ये झाला होता. शशी कपूर हे दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे पुत्र, तर शोमॅन राज कपूर आणि अभिनेते शम्मी कपूर यांचे बंधू. शशी कपूर यांच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही तीन मुलं आहेत.

परदेशी अभिनेत्री जेनिफर केंदाल सोबत 1958 मध्ये ते विवाहबंधनात अडकले.

1961 मध्ये धर्मपुत्र या चित्रपटातून शशी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यापूर्वी पोस्ट बॉक्स 999 या सिनेमासाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं.

ShashiKapoor

अभिनेत्री नंदा यांच्यासोबत शशी कपूर यांचे मोहब्बत इसको कहते है, जब जब फूल खिले, नींद हमारी ख्वाब तुम्हारे, राजा साब, रुठा ना करो यासारखे अनेक चित्रपट गाजले. राखी, शर्मिला टागोर, झीनत अमान सोबतही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

दिवंगत अभिनेते शशी कपूर यांची कारकीर्द


अमिताभ बच्चन यांच्यासोबत दीवार चित्रपटातील त्यांची जुगलबंदीही प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली. त्यांनी जवळपास 116 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यापैकी 61 सिनेमे सोलो हिरो म्हणून गाजले, तर 55 चित्रपट मल्टिस्टारर होते.

कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी 2011 मध्ये शशी कपूर यांचा भारत सरकारने 'पद्म भूषण' प्रदान करुन गौरव केला होता. 2014 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कारही शशी कपूर यांना बहाल करण्यात आला होता.

शशी कपूर यांचे गाजलेले चित्रपट

जब जब फूल खिले (1965)

हसीना मान जाएगी (1968)

शर्मिली (1971)

चोर मचाये शोर (1974)

दीवार (1975)

प्रेम कहानी (1975)

चोरी मेरा काम (1975)

कभी कभी (1976)

फकिरा (1976)

सत्यम शिवम सुंदरम (1978)

त्रिशूल (1978)

दुनिया मेरी जेब मे (1979)

काला पत्थर (1979)

सुहाग (1979)

शान (1980)

सिलसिला (1981)

नमक हलाल (1982)

शशी कपूर यांची गाजलेली गाणी

परदेसियोंसे ना अखिया मिलाना (जब जब फूल खिले 1965)

एक था गुल और एक थी बुलबुल (जब जब फूल खिले 1965)

दिन है बहार के (वक्त 1965)

नैन मिलाकर चैन चुरान (आमने सामने 1967)

लिखे जो खत तुझे (कन्यादान 1968)

नि सुलताना रे (प्यार का मौसम 1969)

तुम बिन जाऊ कहा (प्यार का मौसम 1969)

थोडा रुक जाएगी तो (पतंगा 1971)

ओ मेरी शर्मिली (शर्मिली 1971)

आज मदहोश हुआ जाए रे (शर्मिली 1971)

वादा करो नही छोडोगे तुम मेरा साथ (आ गले लग जा 1973)

तेरा मुझसे है पहले का नाता कोई (आ गले लग जा 1973)

ले जाएंगे, ले जाएंगे.. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (चोर मचाये शोर 1974)

कभी कभी मेरे दिल में (कभी कभी 1976)

रात बाकी बात बाकी (नमक हलाल 1982)

जवानी जानेमन हसीन दिलरुबा (नमक हलाल 1982)

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shashi Kapoor the veteran bollywood actor died at age 70, breaking news marathi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV