भाषा स्वबळाची, लढा स्वकीयांशी, शिवसैनिकांचा आपापसात राडा!

शिवाजी कदम हे वर्षभरापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाय त्यांचे वयही जास्त आहे. त्यामुळे कदम यांना शाखाप्रमुख पद दिल्याने स्थानिक शिवसैनिक नाराज होते.

भाषा स्वबळाची, लढा स्वकीयांशी, शिवसैनिकांचा आपापसात राडा!

मुंबई : शिवसेनेतील नव्या नियुक्त्यांवरुन घाटकोपरमध्ये शिवसैनिकच आपापसात भिडल्याची घटना घडली. शाखाप्रमुख पदावरुन दोन गटातील शिवसैनिक एकमेकांना भिडले.

एकीकडे उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वबळाची घोषणा करुन हिंमतीने लढण्याची भाषा केली, तर दुसरीकडे शिवसैनिकच एकमेकांच्या जीवावर उठल्याची चित्र आहे.

घाटकोपर पश्चिममधील शाखा क्र. 129 च्या बाहेर शिवसैनिक भिडले. या शाखेच्या विभागात प्रदीप मांडवकर हे गेल्या सहा वर्षांपासून विभागाचे शाखाप्रमुख होते. मात्र नव्या नियुक्त्यांनंतर शिवाजी कदम यांची या पदावर निवड झाली.

शिवाजी कदम यांनी वर्षभरापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाय त्यांचे वयही जास्त आहे. त्यामुळे कदम यांना शाखाप्रमुख पद दिल्याने स्थानिक शिवसैनिक नाराज होते. याच नाराजीतून मांडवकर आणि कदम यांच्या गटांमध्ये भांडण झालं.

पाहा व्हिडीओ :

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shiv Sainiks controversy over branch chief designation latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Shivsena शिवसेना
First Published:
LiveTV