करवापसीबद्दल अभिनंदन,वसूल केलेला GST परत करणार का?: उद्धव ठाकरे

जीएसटीमध्ये बदल म्हणजे सरकार ताळ्यावर आल्याचं लक्षण आहे, असंच जागं राहून आवाज उठवल्यास सरकार झुकेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

करवापसीबद्दल अभिनंदन,वसूल केलेला GST परत करणार का?: उद्धव ठाकरे

मुंबई: केंद्र सरकारने  जीएसटी दरात केलेल्या कपातीबद्दल त्यांचं अभिनंदन, पण आता इतके दिवस वसूल केलेला GST परत करणार का असा सवाल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

जीएसटीमध्ये बदल म्हणजे सरकार ताळ्यावर आल्याचं लक्षण आहे, असंच जागं राहून आवाज उठवल्यास सरकार झुकेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात तातडीची पत्रकार परिषद घेतली.

हॉटेलमध्ये दोन ताटं एक्स्ट्रा

केंद्र सरकारने विविध करांच्या रुपातून जनतेची लक्ष्मी ओरबाडून घेतली आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत कसलं लक्ष्मीपूजन करायचं हा, लोकांसमोर प्रश्न आहे. सध्या सोशल मीडियावर जोक फिरतायेत, हॉटेलमध्ये जेवायला जरी गेलं तरी दोन माणसांची ताटं बाजूला ठेवावी लागतात, एक म्हणजे राज्याचा जीएसटी आणि दुसरा केंद्राचा जीएसटी. या वाढत्या करांमुळे देशात अस्वस्थता आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचे दोन विषय मार्गी

शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत तीन विषय मांडले, त्यापैकी दोन विषय मार्गी लागलेत. त्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद.

एक म्हणजे अंगणवाडीसेविकांच्या संपात सरकारने तोडगा काढला, दुसरा म्हणजे रेल्वे फूटओव्हर ब्रिजवरील फेरीवाल्यांना हटवण्याबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं होतं, त्यानुसार कारवाई सुरु आहे, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

तिसरा विषय म्हणजे सुरक्षारक्षकांचा. मला खात्री आहे मुख्यमंत्री त्याबाबतही निर्णय घेतील, काही विषयांना वेळ लागतो, याची जाणीव आहे, पण हा विषयही निकाली निघेल अशी आशा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

जीएसटी कपात निर्णय योग्य

केंद्र सरकारने जीएसटीमध्ये कपात करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. तुम्ही किती कर लावता हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. कर कमी करुन चित्र असं उभं केलं जातय जसं दिवाळीची भेट दिली. पण ही दिवाळीची भेट नाही, तर मी तुम्हाला छळणार नाही, असा त्याचा अर्थ आहे आणि ही सुद्धा आपल्याला भेट वाटू लागली, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

जीएसटी मागे घेण्याचा निर्णय हा दिलासा नाही तर सरकारचा नाइलाज आहे. हे जनतेचं यश आहे, जनतेच्या असंतोषामुळे सरकारने हा निर्णय घेतला. व्यापाऱ्यांनीही एकजुटीने विरोध करुन सरकारला झुकवलं, ही एकजूट महत्त्वाची आहे, असं उद्धव म्हणाले.

महागाई-पेट्रोल, भारनियमन

महागाई कमी झाली पाहिजे, पेट्रोल दर कमी व्हायलाच हवेत, शिवाय भारनियमन हे तत्वता नाही तर संपूर्ण रद्द व्हायला हवं असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

भारनियमनामुळे झळा बसतायेत, तात्पुरता दिलासा नको,कोळशाचा तुटवडा होणार हे आधी कळालं नाही का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद LIVE UPDATE

  • जीएसटी दरबदलाबद्दल केंद्रसरकारचं अभिनंदन - उद्धव ठाकरे

  • महागाई, पेट्रोलचे दर कमी व्हायला हवी- उद्धव ठाकरे

  • मोदींनी चांगले निर्णय घेतले तर कौतुक करतोच, अन्यथा आमची आंदोलनं सुरुच आहेत

  • जीएसटी म्हणून एवढे दिवस वसूल केलेला कर सरकार परत करणार का? : उद्धव ठाकरे

  • करवापसीबद्दल अभिनंदन, मग इतके वर्षे वसूल केलेला कर परत करा

  • मस्तवाल सत्ताधाऱ्यांना जनतेने झुकवलं

  • 'तत्वत:' नको, तर पूर्ण भारनियमन तातडीने रद्द करा, लोकांचा अंत पाहू नका,

  • व्यापाऱ्यांचं अभिनंदन, मात्र, जनता अजून सुखी नाही

  • भारनियमनामुळे झळा बसतायेत, तात्पुरता दिलासा नको,कोळशाचा तुटवडा होणार हे आधी कळालं नाही का?

  • केंद्र सरकारला हेच सांगाचंय- जनतेच्या असंतोषाचा उद्रेक होऊ देऊ नका

  • जीएसटीमध्ये बदल करण्याचा निर्णय, सरकारनं दिवाळीची भेट दिलीये असं चित्र निर्माण करण्यात आलं.

  • दिवाळीत त्रास देणार नाही ही मोदींची भेट असेल, उद्धव ठाकरेंचा टोला

  • रेल्वेच्या फुटओव्हर ब्रीजवरील फेरीवाल्यांचा प्रश्न शिवसेनेमुळे सुटला

  • अंगणवाडीसेविकांच्या संपावर तोडगा काढल्याने राज्य सरकारचे आभार : उद्धव ठाकरे

  • केंद्र सरकारने सर्वसामान्यांकडून लक्ष्मी ओरबाडून घेतली : उद्धव ठाकरेसंबंधित बातम्या

 15 दिवसात फेरीवाले हटवा, अन्यथा 16 व्या दिवशी आम्ही हटवू : राज ठाकरे


महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएत सामील होणार : राणे

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV