नारायण राणेंच्या राज्यसभा उमेदवारीस शिवसेनेचा आक्षेप

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला आता शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे.

नारायण राणेंच्या राज्यसभा उमेदवारीस शिवसेनेचा आक्षेप

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला आता शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे. भाजपनं महाराष्ट्रातून आपल्या कोट्यातील तीन जागांपैकी एका जागेसाठी नारायण राणेंना पुढे केलं आहे. मात्र, अर्जात राणेंनी कोणत्या पक्षाचं नाव लिहिलं आहे?. ते भाजपनं जाहीर करावं असं आव्हानंच शिवसेना नेते अनिल परब यांनी दिलं आहे.

परब इथेच थांबले नसून त्यांनी राणेंनी भाजपचं सदस्यत्व कधी स्वीकारलं, त्याची पावती आहे का? असे अनेक अडचणीचे प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेनं राणे आणि भाजपची चांगलीच गोची झाली आहे.

अनिल परब यांनी उपस्थित केलेले मुद्दे :

- नारायण राणे यानी कोणाच्या पक्षाकडून राज्यसभेचा अर्ज भरला?

- भाजपने उमेदवारी दिली असेल तर त्यांनी भाजपचे सदस्यत्व कधी स्वीकारले? त्याची काही पावती, इ मेल?

- नेमकं कोणत्या मार्गाने त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले?

- जर नारायण राणे यांनी सदस्यत्व स्वीकारले असेल तर त्यांनी त्यांच्या स्वाभिमानी पक्षाचा राजीनामा दिला का?

- एका पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा सदस्य होऊ शकत नाही.

- जर दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला उमेदवारी द्यायची असेल तर त्याला आधी आपल्या पक्षाचा अधिकृत सदस्य करुन घ्यावा लागतलो. तरच त्याला पक्षाला बी फॉर्म देता येतो. असे नियम आहेत.

असे सवाल करत शिवसेना आमदार अनिल परब यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातम्या :

राणेंना राज्यसभेची ऑफर आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी

शिवसेनेच्या भीतीने राणेंना राज्यसभेची ऑफर : रामदास आठवले

नारायण राणेंना भाजपची ऑफर अमान्य?

राज्यसभेसाठी भाजपची महाराष्ट्रातून राणेंसह 3 नावं निश्चित : सूत्र

मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर: नारायण राणे

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shiv Sena’s opposition to Narayan Rane’s Rajya Sabha nomination latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV