शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार : मुनगंटीवार

‘शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका. पण पुढची निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार.’

शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार : मुनगंटीवार

मुंबई : ‘शिवसेना आणि भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार’, असा थेट दावा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतच केला आहे.

‘शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका. पण पुढची निवडणूक सेना - भाजप एकत्र लढणार.’ असा दावा मुनगंटीवार यांनी विरोधकांना उद्देशून केला.

‘उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काहींना तर मंत्री बनण्याची घाई झाली आहे. मात्र पुन्हा सत्ता आमचीच येणार.’ असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला‘आमच्यात किती ही वाद झाले तरी आमचे आमही बघून घेऊ . काँग्रेस-राष्ट्रवादी 1999 मध्ये  असेच भांडले आणि नंतर एकत्र झाले होते. आता तुम्हाला एकमेकांची गरज असल्याने एकत्र आलात त्यामुळे आम्हीही वेगळं न लढता एकत्र येऊ.’ असा विश्वास मुनगंटीवार यांनी सभागृहात विरोधकांना प्रत्युत्तर देताना व्यक्त केला.

एकीकडे शिवसेनेनं 2019 लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. अशावेळी मुनगंटीवार यांनी थेट सभागृहात आपण एकत्र लढणार असल्याचं म्हटल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. त्यामुळे शिवसेना आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

संबंधित बातम्या :

शिवसेना लोकसभा, विधानसभा स्वबळावर लढणार!

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shivsena and BJP alliance will in next elections said Sudhir Mungantiwar latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV