एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : ... तर ही दुर्घटना टाळता आली असती!

ज्या पुलावर ही दुर्घटना घडली, त्या पुलासंदर्भात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी एका वर्षापूर्वीच पत्र लिहिलं होतं.

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : ... तर ही दुर्घटना टाळता आली असती!

मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पुलावर  मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले आहेत. ज्या पुलावर ही दुर्घटना घडली, त्या पुलासंदर्भात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी एका वर्षापूर्वीच पत्र लिहिलं होतं. मात्र तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी निधी नसल्याचं कारण दिलं होतं.

prabhu-letter

अरविंद सावंत यांनी गेल्या वर्षी एल्फिन्स्टन सुरेश प्रभू यांना पत्र लिहून पुलासंदर्भात मागणी केली होती. मात्र सुरेश प्रभू यांनी जागतिक मंदीमुळे निधी नसल्याचं कारण दिलं होतं. त्यामुळे एका वर्षापूर्वीच या पुलाचा प्रश्न मार्गी लागला असता, तर ही दुर्घटना टाळता आली नसती का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

एल्फिन्स्टन-परेलला गर्दी का होते?

परेल आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांवर सकाळच्या वेळी कायमच प्रवाशांची गर्दी असते. अनेक ऑफिस या भागात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकरदार या भागात लोकलने येतात. गेल्या काही वर्षांत प्रवाशांची संख्या वाढलेली आहे, मात्र ब्रिजची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने काहीच प्रयत्न झालेले नाहीत.

उद्या दसरा असल्यामुळे अनेक जण खरेदीसाठी दादर आणि परिसरात जातात. सकाळच्या वेळेत असलेली गर्दी आणि त्यातच दोन्ही मार्गांवर लोकल आल्यास अचानक उडणारी झुंबड नेहमीची आहे. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाल्याचं म्हटलं जात आहे.

प्रवाशांच्या तुलनेत ब्रिजची क्षमता कमी असल्यामुळे गर्दीच्या वेळी पुलावर ताण वाढतो, अशी ओरड नेहमीच प्रवाशांकडून होते. त्याकडे प्रशासनाकडून लक्ष न दिलं गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

या घटनेनंतर स्थानिक रहिवासी आणि रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मृतांविषयी हळहळ व्यक्त केली जात असतानाच या अपघातासाठी प्रशासनाला जबाबदार ठरवलं जात आहे.

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना हेल्पलाईन नंबर आणि आवाहन

हेल्पलाईन –

24136051
24107020
24131419

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV