शिवसेना सुभाष देसाईंच्या पाठीशी : उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले की, "पण आरोप कर राजानीमा दे, असा पायंडा पडला तर ते महाराष्ट्राच्या प्रतिमेला साजेसं नसेल.

Shivsena president Uddhav Thackeray backs Subhash Desai

मुंबई : शिवसेना सुभाष देसाई यांच्या पाठीशी आहे, असं सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देसाईंची पाठराखण केली. विरोधकांच्या मागणीनंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजीनाम्याच्या तयारी दाखवली. त्यावर उद्धव ठाकरेंनी पक्षाचा देसाईंना पाठिंबा असल्याचं सांगितलं.

एआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी 60 टक्के भूखंड वगळल्याचा आरोप करत विरोधकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर देसाईंनी राज्यानाम्याची तयारी दर्शवली आहे. मात्र राजीनामा देण्याची काहीही गरज नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं देसाई म्हणाले.

विरोधकांची निष्पक्ष चौकशी करा : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले की, “भ्रष्टाचाराने बरबटलेल्या विरोधकांनी ज्या पद्धतीने आरोप केले आणि चिखल उडवला, ही गोष्ट लांच्छनास्पद आहे. आरोप करणारे हे स्वत: भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये गुंतले आहेत. अशा घोटाळेबाज लोक वर तोंड करुन आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात ही गोष्ट लाजिरवाणी आहे.”

विरोधकांच्या आरोपांनंतर सुभाष देसाईंची राजीनाम्याची तयारी

“एवढे आरोप झाल्यानंतर काल सुभाष देसाई माझ्याकडे आले. त्यांनी संपूर्ण प्रकरण मला सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याचं वचन विधानसभेत दिल्याचं देसाईंनी सांगितलं. एक शिवसैनिक म्हणून मी पदाला चिकटून राहणार नाही, मी राजीनामा देऊन मोकळा होतो. मंत्री म्हणून दबाव येऊ नये. कोणाला वाटत असेल तर मी राजीनामा देतो. त्यानुसार आज सकाळी ते मुख्यमंत्र्यांकडे गेले,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले की, “पण आरोप कर राजानीमा दे, असा पायंडा पडला तर ते महाराष्ट्राच्या प्रतिमेला साजेसं नसेल. घोटाळे केलेल्या विरोधकांची निष्पक्षपातीपणे चौकशी करुन जर ते गुन्हेगार असतील तर त्यांना त्याची शिक्षा मिळायला पाहिजे, अशी शिवसेनेची विनंती आहे.”

सुभाष देसाईंवरील आरोप
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी 600 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र शिवसेनेच्या जवळच्या बिल्डरला फायदा मिळावा यासाठी यातली 400 एकर जमीन देसाईंनी आरक्षित भूखंडातून वगळल्याचा आरोप विरोधकांनी सुभाष देसाईंवर केला आहे.

त्यामुळे उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली होती. त्यानंतर सुभाष देसाईंनी चौकशी होईपर्यंत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला नाही.

पाहा व्हिडीओ

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Shivsena president Uddhav Thackeray backs Subhash Desai
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

रावतेंबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचा पश्चाताप नाही : हाजी अराफत
रावतेंबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचा पश्चाताप नाही : हाजी अराफत

मुंबई : शिवसेनेच्याच कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचे

फोडाफोडी केली नाही, विश्वासाने 'ते' शिवसेनेसोबत : उद्धव ठाकरे
फोडाफोडी केली नाही, विश्वासाने 'ते' शिवसेनेसोबत : उद्धव ठाकरे

मिरा भाईंदर : आम्ही फोडाफोडी केलेली नाही, लोक विश्वासाने आले आहेत,

मिरा भाईंदर महापालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात, रविवारी मतदान
मिरा भाईंदर महापालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात, रविवारी मतदान

मिरा भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेचा रणसंग्राम शिगेला पोहचला आहे.

विशेष अधिकार नसलेले लोकायुक्त प्रकाश मेहतांची चौकशी करणार
विशेष अधिकार नसलेले लोकायुक्त प्रकाश मेहतांची चौकशी करणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण मंत्री

मीच मुख्यमंत्री, दानवेच प्रदेशाध्यक्ष, फडणवीसांचं स्पष्टीकरण
मीच मुख्यमंत्री, दानवेच प्रदेशाध्यक्ष, फडणवीसांचं स्पष्टीकरण

मुंबई : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावरुन रावसाहेब दानवे

327 गायक, 109 शब्द, प्रत्येकाचा वेगळा नाद, गिनीज बुकमध्ये नोंद
327 गायक, 109 शब्द, प्रत्येकाचा वेगळा नाद, गिनीज बुकमध्ये नोंद

नवी मुंबई: तब्बल 327 गायकांनी एका वेळेस वेगवेगळे शब्द उच्चारत गाणे

मिरा भाईंदरमध्ये मतदार यादीत घोळ, काँग्रेसचा आरोप
मिरा भाईंदरमध्ये मतदार यादीत घोळ, काँग्रेसचा आरोप

मिरा भाईंदर : महापालिकेची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली

अवैध कॉफी शॉपला संरक्षण, हायकोर्टाने सरकारला झापलं
अवैध कॉफी शॉपला संरक्षण, हायकोर्टाने सरकारला झापलं

मुंबई : नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील आणि मुख्यमंत्र्यांचे

झोपेत महिलांचे केस कापण्याचं लोण मुंबईत, 3 महिलांचे केस कापले
झोपेत महिलांचे केस कापण्याचं लोण मुंबईत, 3 महिलांचे केस कापले

मुंबई: उत्तर भारतातील केस कापण्याच्या घटनांचं लोण आता मुंबईतही

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा मुंबई लोकलने प्रवास
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा मुंबई लोकलने प्रवास

मुंबई: येत्या 20 ऑगस्ट रोजी मिरा भाईंदरमध्ये महापालिका निवडणुका होत