करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

शिवसेना करोडो रुपये देऊन नगरसेवकांना विकत घेत असल्याचा आरोप, सोमय्यांनी केला आहे.

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

मुंबई: भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. शिवसेना करोडो रुपये देऊन नगरसेवकांना विकत घेत असल्याचा आरोप, सोमय्यांनी केला आहे. त्याबाबतचं पत्र त्यांनी निवडणूक आयोग, पोलीस, कोकण महसूल विभाग यांना लिहिलं आहे.

धक्कादायक म्हणजे आमच्या मित्रपक्षाने 4 नगरसेवकांना किडनॅप केलं असून, त्यांना 2 ते 4 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे, असा दावा सोमय्यांनी केला.

Kirit Somaiya

त्यातील एक नगरसेवक घाटकोपरचा आहे. त्याच्या परिवाराने आमच्याशी संपर्क साधला आहे, असंही सोमय्यांनी म्हटलंय.

दुसरीकडे भाजपचे नगरसेवक मनोज कोटक यांनीही, मनसेचे काही नगरसेवक गायब असून त्यांना शिवसेनेनं विकत घेतल्याचा आरोप केला आहे.

पोटनिवडणुकीमुळे शिवसेना-भाजपची चढाओढ

मुंबईतील प्रभाग क्र. 116 मध्ये (भांडुप पश्चिम) पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला.

त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजपचं संख्याबळ 83 तर शिवसेनेची संख्या 84 झाली आहे. मात्र शिवसेनेला 4 अपक्ष तर भाजपला 2 अपक्षांची साथ आहे.

'लवकरच मुंबईत आमचा महापौर', सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान

‘मुंबई महापालिकेत चिन्हानुसार आता शिवसेना 84 आणि भाजप 83 अशी स्थिती झाली आहे. मी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान देतो, ही स्थिती लवकरच बदलून भाजप 84 आणि शिवसेना 83 अशी होईल आणि आमचा महापौर बसेल.’ असं वक्तव्य सोमय्यांनी केलं होतं.

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल = 227

  • शिवसेना अपक्षांसह – 84 +  4 अपक्ष = 88

  • भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 83+अपक्ष 2= 85

  • कॉंग्रेस – 30

  • राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9

  • मनसे – 7

  • सपा – 6

  • एमआयएम – 2


संबंधित बातम्या

भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?


मोठे दावे करणार्‍यांचे पोट फाडून भाजपचा विजय : आशिष शेलार


‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान


मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी


शिवसेनेला पश्चाताप, जागृती पाटील सेनेत येणार होत्या!

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV