शिवसेना गुजरातमध्ये निवडणूक लढवणार

शिवसेनेनं गुजरातच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी शिवसेना खासदार अनिल देसाई अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.

शिवसेना गुजरातमध्ये निवडणूक लढवणार

 

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणूक लढणार नाही. या भूमिकेवरुन शिवसेनेनं यू-टर्न घेतला आहे. त्यामुळे आता शिवसेनेनं गुजरातच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी शिवसेना खासदार अनिल देसाई अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.

शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी आणखी वाढू शकते. 40 हून अधिक जागांवर शिवसेना आपले उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे हिंदुत्वावादी मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम भाजपला भोगावा लागू शकतो.

यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नाही. असं म्हटलं होतं. पण आता अचानकपणे शिवसेना निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे.

एकीकडे भाजपला गुजरातमध्ये हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांचा सामना करायला लागत असताना दुसरीकडे शिवसेनेनं थेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं भाजपच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shivsena will contest the Gujarat elections latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV