बाबा मंत्री, माझा दोष काय? बडोलेंच्या मुलीचा शिष्यवृत्ती सोडण्याचा निर्णय

कुणाचाही हक्क आपण डावलला नसून, जर यामुळे कुण्या दुसऱ्याची गुणवत्ता झाकोळली जाणार असेल तर आपण शिष्यवृत्ती नाकारत असल्याचंही श्रुतीनं पत्रातून स्पष्ट केलं आहे.

बाबा मंत्री, माझा दोष काय? बडोलेंच्या मुलीचा शिष्यवृत्ती सोडण्याचा निर्णय

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंची कन्या श्रुती बडोलेने स्वत:हून परदेश शिष्यवृत्ती सोडण्याची तयारी दर्शवली आहे. शिष्यवृत्ती निवडीवरुन झालेल्या वादानंतर श्रुतीनं हा निर्णय घेतला आहे.

यावेळी श्रुतीनं आपल्याला गुणवत्तेनुसार प्रवेश आणि शिष्य़वृत्ती मिळाली असल्याचा दावा केला आहे. तसंच, माझ्यात गुणवत्ता आहे पण माझे बाबा मंत्री आहेत, त्यात माझा काय दोष? असा सवालही श्रुतीनं विचारला आहे. मात्र, कुणाचाही हक्क आपण डावलला नसून, जर यामुळे कुण्या दुसऱ्याची गुणवत्ता झाकोळली जाणार असेल तर आपण शिष्यवृत्ती नाकारत असल्याचंही श्रुतीनं पत्रातून स्पष्ट केलं आहे.

श्रुतीने पत्रात काय म्हटलंय?
“मी श्रुती राजकुमार बडोले आयआयटी मद्रासमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यावेळी माझे वडील मंत्री नव्हते. युकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्समध्ये मी माझं एम एस्सी पूर्ण केलं. याठिकाणी मी गुणवत्तेनुसार माझा प्रवेश आणि शिक्षण झालं. विद्यापीठाने गुणवत्तेमुळे मला शिष्यवृत्ती दिली (सरकारने नव्हे). अवकाश संशोधनात काम करायचं हे माझं स्वप्न होत त्यानुसार मी एक एक पायरी चढत गेले तीही गुणवत्तेनुसारच, त्यावेळी माझे वडील मंत्री नव्हते.

अॅस्ट्रोफिजिक्स या विषयात जगातल्या पहिल्या सव्वीस व्या विद्यापीठात माझी निवड झाली. ती गुणवत्तेनुसारच.

मला यापूर्वी गुणवत्तेनुसार परदेशातल्या विद्यापीठांनी शिष्यवृत्ती दिलीय. पण पीएचडीसाठी शिष्यवृत्तीची या विद्यपीठात सवलत नाहीय. गुणवत्तेनुसार माझी निवड झाली आहे तर मी याच विद्यापीठात  प्रवेश घेणार म्हणून मी राज्य सरकारकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. (जगातल्या पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत असेल तर त्या विद्यार्थ्याला कुठलाही आर्थिक निकषांची अट नाही हा जीआर आहे.) तरी मंत्र्यांची मुलगी आहे यावर वाद होतील हे आधी वडिलांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे वडिलांनी या निवड प्रक्रियेपासून स्वतःला बाजूला केलं.

‘पीएचडी इन सायन्स’साठी राज्य सरकारच्या शिष्यवृत्तीकरता तीन जागा आहेत. या तीन जगासाठी केवळ दोन अर्ज आले आहेत. त्यात एक जागा अजूनही रिक्त आहे. या जागेसाठी अजूनही अर्ज आलेला नाही. तर मी कुणाला डावलून शिष्यवृत्ती मिळवली का? जगातल्या पहिल्या 100 विद्यापीठात प्रवेश घेताना आर्थिक निकष लागू नाहीत हा माझ्या शिक्षणापूर्वीचा नियम आहे. यात मी पात्र असेल तर यात माझा दोष आहे का? माझं यापूर्वीच शिक्षण गुणवत्तेनुसार झालं आहे. आता वडिलांच्या मंत्रिपदामुळे माझी गुणवत्ता कमी झाली का?

कुणाचाही हक्क कधी डावलला नाही आणि कधी डावलणारही नाही. वडील मंत्री आहेत म्हणून शिष्यवृत्तीवर वाद होत असेल आणि यामुळे माझी गुणवत्ता झाकोळली जाणार असेल, तर मी शिष्यवृत्ती नाकारत आहे. पण मी शिकणार आणि अवकाश संशोधनात जाणारच. सावित्रीबाई आणि बाबासाहेबांचं शिक्षणासाठीच स्वप्न साकार करण्यासाठी.”

श्रुती राजकुमार बडोले

 

काय आहे प्रकरण?

राजकुमार बडोले यांची मुलगी श्रुती बडोले हिला अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रॉफीजिक्स या विषयांमध्ये पीएचडी करण्यासाठी इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठमध्ये 3 वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे.

समाज कल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी दयानंद मेश्राम यांच्या मुलांची नावंही ही या यादीत आढळतात.

अनुसूचित जातीच्या गरजू विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना मंत्र्यांनी मुलांसाठी वापरल्याचा आरोप होत आहे.

संबंधित बातम्या :
परदेशी शिष्यवृत्तीसाठी मुलीची निवड निकषानुसार : बडोले

सामाजिक न्यायमंत्र्यांच्या मुलीलाच परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV