व्हिपनंतरही मनसेच्या बंडखोर नगरसेवकांची सभागृहात अनुपस्थिती

पक्षाकडून सूचना मिळाल्याशिवाय महापालिका सभागृह किंवा कोणत्याही बैठकीत मतदान करु नये. मतदान केल्यास पक्षाकडून कारवाई केली जाईल, असे आदेश या व्हीपद्वारे देण्यात आले होते.

व्हिपनंतरही मनसेच्या बंडखोर नगरसेवकांची सभागृहात अनुपस्थिती

मुंबई : मनसे सोडून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांनी आज मुंबई महापालिकेच्या सभागृहात गैरहजेरी लावली. मनसेने पक्षाच्या परवानगीशिवाय मतदान करणाऱ्या नगरसेवकांना व्हिप जारी केला होता. त्यावर शक्कल म्हणून मनसेतून शिवसेनेत आलेले नगरसेवक अनुपस्थितीत राहिल्याची माहिती आहे.

सहाही नगरसेवक पुन्हा मनसेत जाण्याच्या चर्चा निव्वळ अफवा असल्याची माहिती मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दिलीप लांडे यांनी दिली आहे. मुद्दामहून अशा अफवा पसरवल्या जात असल्या, तरी आम्ही शिवसेनेतच राहू, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणार?

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दोन नगरसेवकांवर, लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात एसीबी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

मनसेत राहिलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे आणि भाजपने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती.

शिवसेनेने कोट्यवधी रुपये देऊन नगरसेवक फोडले, तसंच त्यांनी घोडेबाजार केल्याचा आरोप, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याबाबतची तक्रार त्यांनी एसीबीकडे केली होती.

संबंधित बातम्या

शिवसेनेत गेलेल्या मनसेच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणार?

सहाही नगरसेवकांना बदनाम करण्याचं षडयंत्र : दिलीप लांडे 

मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक आमच्यासोबतच : शिवसेना 

शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: six corporators who entered in si
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV