केवळ दहा रुपयात निद्रानाशाचं नेमकं कारण शोधा!

केवळ दहा रुपयात निद्रानाशाचं नेमकं कारण शोधा!

मुंबई: दिवसभर धावपळ करुनही आपल्यापैकी अनेकांना शांत झोप मिळत नाही. हळूहळू हा विकार इतका बळावतो की औषधं घेऊनही निदान होत नाही. मात्र निद्रानाशावर रामबाण ठरणारी थेरपी मुंबईतल्या कुपर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे.

तुम्हाला निद्रानाशाचा विकार आहे का?

झोप मिळत नसल्यामुळं आरोग्याचं गणित बिघडलंय का? किंवा घोरण्याच्या सवयीमुळं तुम्ही दुसऱ्याचीही झोप मोडता का?

जर तुम्ही यापैकी एकाही समस्येनं त्रस्त असाल, तर तुम्हाला मुंबईतलं कूपर रुग्णालय गाठायलाच हवं.

कारण या रुग्णालयातल्या स्लीप लॅबमध्ये तुमच्या निद्रानाशेचं थेट कारण शोधणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणि त्या थेरपीचं नाव आहे... स्लीप ऍप्निया थेरपी..

काय आहे स्लीप एप्निया थेरपी?

या थेरपीसाठी खास कूपर रुग्णालयात स्लीप रूम तयार केली आहे. या थेरपीमध्ये रुग्णाला 7-8 तास स्लिप रूम मध्ये झोपवलं जातं. त्याला मशीनद्वारे त्याच्या प्रत्येक गोष्टीचं चेक अप केलं जातं. यामध्ये ह्रदयाचे ठोके, श्वसन, फॅट या सगळ्या गोष्टींचं चेक-अप केल्यानंतर सॉफ्टवेअरचा उपयोग करून रुग्णाला नेमका कशामुळे निद्रानाशाचा त्रास होतो याचं निवारण केलं जातं.

त्यानंतर त्याच्यावर औषध आणि इतर ट्रीटमेंट देऊन उपचार केले जातात. मुख्य करून स्थूलपणा, रात्री घोरणे , श्वसनाचा त्रास यामुळे निद्रानाशाचा त्रास रुग्णाला जाणवतो, असं डॉक्टरांच म्हणणं आहे.

आता या अद्यावत आणि हायटेक थेरपीसाठी मोठी रक्कम तर मोजीव लागणार नाही ना, या प्रश्नानं तुमची झोप उडाली असेल.

डॉक्टरांच्या माहितीनुसार या ट्रीटमेंटसाठी फक्त 10 रुपये मोजावे लागतात.

एवढ्या स्वस्तात स्लीप ऍप्निया थेरपी मिळत असल्यामुळं रुग्ण देखील या सेवेचा मोठा लाभ घेत आहेत.

निद्रानाशानं ग्रासलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसंच निद्रानाश अनेक आजारांना जन्माला घालणारा विकार आहे.

मात्र निद्रानाश नेमका कशामुळं झालाय, याचं ठोस कारण समजल्याशिवाय त्यावर उपचार करणंही कठीण होऊन बसतं. पण आता स्लीप ऍप्निया थेरपीमुळं या समस्येवर रामबाण उपाय सापडला आहे.

जर तुमची झोप हरवली असेल, तर स्लीप ऍप्निया थेरपीद्वारे ती परत मिळवू शकता.

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV