मुजोर कॅब चालकाचा स्मिता ठाकरेंवर हल्ला, हल्लेखोर अटकेत

ठाकरे घराण्याच्या सूनबाई आणि चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरेंवर बंगळुरुमध्ये एका कॅब चालकानं हल्ला केल्याची घटना घडली आहे.

मुजोर कॅब चालकाचा स्मिता ठाकरेंवर हल्ला, हल्लेखोर अटकेत

बंगळुरु : ठाकरे घराण्याच्या सूनबाई आणि चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरेंवर बंगळुरुमध्ये एका कॅब चालकानं हल्ला केल्याची घटना घडली आहे.

मंगळवार दुपारच्या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोर कॅब चालकाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्मिता ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाल्या असताना कॅब चालकानं मोबाईलवर बोलण्याच्या नादात जोरदार ब्रेक मारला. यामुळे स्मिता आणि त्यांच्या मैत्रिणीला मोठा झटका बसला.

त्यामुळे संतापलेल्या स्मिता ठाकरेंनी कॅबचालकाला फैलावर घेतलं. मात्र मुजोर चालकानं असभ्य भाषेचा वापर करत त्यांना मारहाण केल्याचंही पोलीस तक्रारीत पुढे आलं आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Smita Thackeray assaulted by cab driver latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV