सिंगल असल्याने या अभिनेत्रीला सोसायटीने घरातून बाहेर काढलं!

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Tuesday, 16 May 2017 12:10 PM
सिंगल असल्याने या अभिनेत्रीला सोसायटीने घरातून बाहेर काढलं!

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या अपकमिंग सिनेमातील अभिनेत्री निधी अग्रवालला सोसायटीने घरातून बाहेर काढल्याची माहिती आहे. दोघे मुन्ना मायकल या सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

निधी घरात एकटी राहते, शिवाय ती सिनेमात काम करते, त्यामुळे तिला वांद्रे येथील घर सोडण्यास सोसायटीने भाग पाडलं. मुंबईसारख्या शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

आपण सिंगल राहत असल्यामुळे सोसायटीने घर सोडण्यास भाग पाडलं, असं निधीने ‘मिड डे’शी बोलताना सांगितलं. यासंबंधीतच आणखी एक वृत्त म्हणजे मुंबईतील अनेक सोसायटींनी सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांना घर न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

दरम्यान केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण भारत आणि जगभरात अशा घटना घडतात. वैवाहिक स्थिती, जात, धर्म, स्त्री-पुरुष असा अनेक प्रकारे भेदभाव केला जातो. मुंबईत गेल्या काही दिवसात अशी उदाहरणं समोरही आली आहेत.

मुंबईची अशा घटनांच्या बाबतीत जगभरात एक वेगळी ओळख आहे. मुंबईत कुणालाही भेदभावाचा सामना करावा लागत नाही. मात्र एका अभिनेत्रीला घर सोडायला लावल्यामुळे या प्रकाराची सर्वत्र चर्चा आहे.

First Published: Tuesday, 16 May 2017 12:10 PM

Related Stories

मीराची प्रसुती करणारा डॉक्टर बेपत्ता, शाहिदकडून मदतीचं आवाहन
मीराची प्रसुती करणारा डॉक्टर बेपत्ता, शाहिदकडून मदतीचं आवाहन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने ट्विटरवर चाहत्यांकडून मदत

दगडफेक करणाऱ्यांऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधा : परेश रावल
दगडफेक करणाऱ्यांऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधा : परेश रावल

मुंबई : आपल्या विनोदी आणि दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे बॉलिवूड

सचिनच्या बायोपिकचं वायुदलासाठी स्पेशल स्क्रीनिंग
सचिनच्या बायोपिकचं वायुदलासाठी स्पेशल स्क्रीनिंग

नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या ‘सचिन ए

रिव्ह्यू : हिंदी मीडियम
रिव्ह्यू : हिंदी मीडियम

इरफान असल्यावर त्या गोष्टीला तो एका वेगळ्या उंचीवर नेणार, अशी भावना

रिव्ह्यू : चि. व चि. सौ. कां.
रिव्ह्यू : चि. व चि. सौ. कां.

चि. व चि. सौ. कां. परेश मोकाशीचा हा प्रदर्शित होणारा तिसरा सिनेमा. पण

सचिन तेंडुलकर पंतप्रधान मोदींच्या भेटीला
सचिन तेंडुलकर पंतप्रधान मोदींच्या भेटीला

नवी दिल्ली : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरने राजधानी नवी

अकबर आणि अँथनी पुन्हा एकत्र, मात्र बाप-लेकाच्या भूमिकेत!
अकबर आणि अँथनी पुन्हा एकत्र, मात्र बाप-लेकाच्या भूमिकेत!

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर ही जोडी

बाहुबली 2 ची पाकिस्तानातही बंपर कमाई
बाहुबली 2 ची पाकिस्तानातही बंपर कमाई

मुंबई : एस एस राजमौली यांच्या ‘बाहुबली 2’ अर्थात ‘बाहुबली : द

ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन

मुंबई: कणखर अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळेपण जपणारी हरहुन्नरी

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर सचिनची फटकेबाजी
'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर सचिनची फटकेबाजी

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चला ‘हवा येऊ द्या’च्या