‘त्या’ ट्विटनंतर गायक सोनू निगमच्या सुरक्षेत वाढ

By: | Last Updated: > Wednesday, 19 April 2017 9:20 AM
‘त्या’ ट्विटनंतर गायक सोनू निगमच्या सुरक्षेत वाढ

मुंबई: अजानबाबत वक्तव्य करणाऱ्या गायक सोनू निगमच्या घराची मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. रोज पहाटे लाउड स्पीकरवरून होणाऱ्या अजानमुळं त्रास होत असल्याचं मत सोनू निगमनं ट्विट केलं होतं. यानंतर सोनू निगमवर अनेकांनी टिकाही केली होती. दरम्यान, काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी त्याच्या घराची सुरक्षा वाढवली आहे.

 

दरम्यान, याप्रकरणी अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी देखील याबाबत काल आपलं मत व्यक्त केलं. ‘नमाजसाठी अजान महत्वाची आहे. पण आजच्या आधुनिक युगात लाऊडस्पीकर गरजेचं नाही.’ असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

 

नेमकं प्रकरण काय?

 

‘मी मुस्लीम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं. भारतातील जबरदस्तीची ही धर्मिकता कधी संपेल?’, असा सवाल सोनू निगमनं केला होता. शिवाय, ‘मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लामची सुरुवात केली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का?’, असंही सोनू निगमनं ट्वीटमधून विचारलं.

 

“जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणाऱ्या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास नाही.”, असंही ट्वीट सोनू निगमनं केलं होतं.

 

Sonu NIgam Tweet

 

दरम्यान, सोनू निगमच्या या ट्वीटनंतर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

 

अजान म्हणजे काय?

 

नमाज अदा करण्याआधी मस्जिदमध्ये लोकांना बोलवण्यासाठी अजान दिली जाते. अजानचा अर्थ बोलावणं किंवा घोषणा करणं असा होतो. नमाजच्या आधी दिवसातून पाच वेळा अजान दिली जाते.

 

संबंधित बातम्या:

 

मशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का? : सोनू निगम

 

‘अजान जरुरी, लाऊडस्पीकर नाही’, सोनू निगमच्या ट्वीटवर अहमद पटेलांचं वक्तव्य

 

First Published:

Related Stories

ओम पुरींचा अखेरचा आवाज, 'ट्युबलाईट'चा ट्रेलर लाँच
ओम पुरींचा अखेरचा आवाज, 'ट्युबलाईट'चा ट्रेलर लाँच

मुंबई : अभिनेता सलमान खानचा मच अवेटेड सिनेमा ट्युबलाईटचा पहिला

शाहरुखच्या भेटीसाठी नाशकातील सहा बहिणींचं घरातून पलायन
शाहरुखच्या भेटीसाठी नाशकातील सहा बहिणींचं घरातून पलायन

नाशिक : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या क्रेझी फॅन्सची संख्या काही

विवेक ओबेरॉयकडून ललिता बन्सीला खास गिफ्ट
विवेक ओबेरॉयकडून ललिता बन्सीला खास गिफ्ट

मुंबई : अॅसिड हल्ल्याची बळी ठरलेली ललिता बन्सी अनेकांसाठी आशेचा

सचिनचा सिनेमा पाहून कोहली भारावला, धोनीची प्रतिक्रिया काय?
सचिनचा सिनेमा पाहून कोहली भारावला, धोनीची प्रतिक्रिया काय?

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावरच्या ‘सचिन : ए

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मध्ये फातिमाला घेण्यासाठी आमीरकडून शिफारस?
'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मध्ये फातिमाला घेण्यासाठी आमीरकडून शिफारस?

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या

झहीर-सागरिकाचा साखरपुडा, नजरा विराट-अनुष्काकडे
झहीर-सागरिकाचा साखरपुडा, नजरा विराट-अनुष्काकडे

मुंबई : ‘चक दे’ गर्ल, अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटपटू झहीर

24 ट्वीट करुन सोनू निगमचा ट्विटरला अलविदा
24 ट्वीट करुन सोनू निगमचा ट्विटरला अलविदा

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीतचं ट्विटर अकाऊण्ट

भारतीय टीमसाठी सचिनच्या बायोपिकचा खास शो
भारतीय टीमसाठी सचिनच्या बायोपिकचा खास शो

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ‘सचिन- अ बिलियन

महिलांविषयी आक्षेपार्ह ट्वीट, गायक अभिजीतचं ट्विटर हँडल सस्पेंड
महिलांविषयी आक्षेपार्ह ट्वीट, गायक अभिजीतचं ट्विटर हँडल सस्पेंड

मुंबई : वादग्रस्त ट्वीट्ससाठी विख्यात असलेला बॉलिवूडचा

'जेम्स बाँड' अभिनेते सर रॉजर मूर यांचं कर्करोगाने निधन
'जेम्स बाँड' अभिनेते सर रॉजर मूर यांचं कर्करोगाने निधन

झुरिच, स्वित्झर्लंड : जेम्स बाँड साकारणाऱ्या कलाकारांपैकी अनेक