माझ्याकडून घडलेल्या अपघाताविषयी दिलगीर : आदित्य नारायण

बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण यांचा मुलगा, गायक आणि अभिनेता आदित्य नारायणने सोमवारी बेदरकारपणे गाडी चालवून रिक्षाला धडक दिली होती

माझ्याकडून घडलेल्या अपघाताविषयी दिलगीर : आदित्य नारायण

मुंबई : प्रसिद्ध गायक आदित्य नारायण याने आपल्याकडून घडलेल्या अपघाताविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे. अंधेरीतील लोखंडवाला भागात आदित्यने बेदरकारपणे मर्सिडीज कार चालवून रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये वृद्ध चालकासह महिला जखमी झाली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण यांचा 30 वर्षीय मुलगा, गायक आणि अभिनेता आदित्य नारायणने सोमवारी बेदरकारपणे गाडी चालवून रिक्षाला धडक दिली होती. अपघातानंतर आदित्यला अटक झाली, मात्र 10 हजारांच्या पर्सनल बाँडवर त्याला जामीन मिळाला.

'हा एक दुर्दैवी प्रकार होता. जे काही झालं त्याबद्दल मला खेद आहे. अपघातानंतर मी लगेच रिक्षाचालक आणि महिला प्रवाशाला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केलं.' असं आदित्यने स्टेटमेंटमध्ये लिहिलं आहे. दोन्ही जखमींचा सर्व वैद्यकीय उचलण्याचं आश्वासन आदित्यने दिलं आहे.

रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी उदीत नारायण यांच्या मुलाला अटक


आदित्यच्या कारच्या धडकेत 64 वर्षीय रिक्षाचालक राजकुमार पालेकर आणि 32 वर्षीय सुरेखा शिवेकर जखमी झाल्या. सुरेखा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोटर वाहन कायद्याच्या कलम 279, 338 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

आदित्य नारायणने बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत. याशिवाय काही सिनेमांमध्ये त्याने अभिनयही केला आहे. 2010 साली शापित या हॉरर सिनेमातून त्याने पदार्पण केलं होतं. सध्या तो एका रिअॅलिटी शोचं अँकरिंग करतो.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sorry for the accident, Singer Aditya Narayan on rash car driving incident latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV