'दहीहंडी, गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम देणार नाही'

दहीहंडी, गणेशोत्सव यासारखे सण तोंडावर आले आहेत. मात्र या सणांना साऊंड सिस्टीम देणार नसल्याचा निर्णय मुंबई आणि पुण्यातील साऊंड सिस्टीम मालकांनी घेतला आहे.

'दहीहंडी, गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम देणार नाही'

मुंबई/पुणे: दहीहंडी, गणेशोत्सव यासारखे सण तोंडावर आले आहेत. मात्र या सणांना साऊंड सिस्टीम देणार नसल्याचा निर्णय मुंबई आणि पुण्यातील साऊंड सिस्टीम मालकांनी घेतला आहे.

न्यायालयाने घालून दिलेली डेसिबलची मर्यादा आणि ती उलटल्यास होणारी कारवाई, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान  साऊंडसिस्टममालकांच्या या निर्णयाला दहीहंडी समन्वय समितीनंही पाठिंबा दिला आहे. तसंच दहीहंडी समन्वय सिमितीने दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा इशारा दिला आहे.

डॉल्बीच्या दणदणाटामुळे दरवर्षीच साऊंड सिस्टीम आणि आवाजाच्या मर्यादेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. शिवाय डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास डॉल्बी मालकांना कारवाईला सामोरं जावं लागतं.

या सर्व प्रकारामुळे साऊंड सिस्टीम मालकांनी यंदा दहीहंडी, गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम न देण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV