श्रीदेवीचा मृत्यू संशयास्पद, पुन्हा शवविच्छेदन व्हावं : एस. बालाकृष्णन

'श्रीदेवीचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता, यामागे नक्कीच कोणता तरी मोठा कट आहे.'

श्रीदेवीचा मृत्यू संशयास्पद, पुन्हा शवविच्छेदन व्हावं : एस. बालाकृष्णन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणी नवनवी माहिती समोर येत असताना आता ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून श्रीदेवी यांचं पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे.

'बाथटब हा फक्त 3 फूट खोल असतो. अशावेळी त्यात कोणी कसा काय बुडू शकतो? तसंच तिच्या शरीरामध्ये अल्कोहलचं प्रमाणंही कमी होतं.' असं बालकृष्णन यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी एस. बालाकृष्णन यांचे काही सवाल

'श्रीदेवीचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता, यामागे नक्कीच कोणता तरी मोठा कट आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती सुरुवातीला समोर आली. सर्वांनी जवळपास त्यावर विश्वासही ठेवला. पण हृदयविकाराच्या झटक्याची बातमी कोणी पसरवली? सत्य लपवून ठेवण्यासाठी कुणीतरी नक्कीच खोटं पसरवलं. हा अपघात आहे की खून हे शोधणं पोलिसांचं काम आहे. तसंच आतापर्यंत सीसीटीव्हीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मृत्यूच्या एक ते दोन तास आधी तिच्या रुममध्ये कोणी गेलं होतं का? याचीही माहिती नाही. त्यामुळे या सर्व गोष्ट संशय निर्माण करतात. तसंच ज्यापद्धतीने दुबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केलीत्यावर देखील अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यांनी चौकशी योग्य पद्धतीने केलेली नाही. हे प्रकरण फारच गंभीर आहे.' असं बालकृष्णन यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे.

24 फेब्रुवारीला श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी नवनवी माहिती समोर येऊ लागली. काल (सोमवार) त्यांच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला त्यात असं म्हटलं होतं की, बाथरुममध्ये चक्कर आल्याने श्रीदेवी बाथटबमध्ये पडली आणि त्यातच बुडून त्यांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे श्रीदेवी यांचं पार्थिव मुंबईत आणण्यास उशीर होत आहे.

त्यामुळे आता याप्रकरणी मुख्यमंत्री बालकृष्णन यांची मागणी मान्य करत श्रीदेवी यांचं पुन्हा शवविच्छेदन करण्यास परवानगी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बालाकृष्णन हे तेच पत्रकार आहेत ज्यांनी मुंबईत लिलाव झालेल्या दाऊदच्या संपत्तीवर बोली लावली होती.

संंबंधित बातम्या : 

श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूरची दुबई पोलिसांकडून चौकशी

श्रीदेवी बॉलिवूडमधल्या अघोरी स्पर्धेची बळी?

गूगल सर्चमध्ये काल दिवसभरात ‘श्रीदेवी’ टॉप

श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू, शरीरात दारुचे अंश आढळले

नवा दावा - श्रीदेवींना बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत हॉटेल स्टाफने पाहिलं!

श्रीदेवी यांना हृदयासंबंधी कोणताही विकार नव्हता : संजय कपूर

'श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या', खलीज टाइम्सचा दावा 

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन 

अर्जुन कपूरसोबत घडलं, तोच दुर्दैवी योगायोग जान्हवीसोबत 

नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये...

श्रीदेवींच्या निधनावरील शोकसंदेशाने काँग्रेस ट्रोल

श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार

म्हणून जान्हवीने तीन दिवस आईशी बोलणं टाकलं

श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार

'रुप की रानी' श्रीदेवी यांची कारकीर्द

लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट

दुबईतील लग्नसोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे फोटो

बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण?

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sridevi’s death is suspicious, Letter to Chief Minister of Balakrishnan latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV