दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळातर्फे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येणार आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचं फेब्रुवारी-मार्च 2018 मधील वेळापत्रक जाहीर झालं आहे. दहावीची परीक्षा 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 दरम्यान, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018 दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वेळापत्रक जाहीर केला.

फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूर या नऊ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर झाल्याचं शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

दहावी-बारावीची परीक्षा कधी?

- बारावीची परीक्षा – 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2018
- दहावीची परीक्षा – 1 मार्च ते 24 मार्च 2018

परीक्षेचं वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं असलं, तरी छापील स्वरुपात प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पाठवण्यात येणार आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळातर्फे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर संकेतस्थळ किंवा व्हॉट्सअॅपवरुन फॉरवर्ड होणाऱ्या वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असेही शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: SSC and HSC exam timetable declared latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV