एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं?

मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी झाली.

एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं?

मुंबई: मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढतच आहे.

आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास फूट ओव्हर ब्रिजवरील पत्रा कोसळल्याचं बोललं गेलं. यामुळे सुरुवातीला घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला आणि चेंगराचेंगरी सुरु झाली.

एल्फिन्स्टन- परेल पुलावर नेमकं काय घडलं?

  • सकाळी 9.30 च्या सुमारास पावसाची मोठी सर आली.

  • त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या.

  • त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाली.

  • त्याचवेळी पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं.

  • गर्दीच्यावेळी मोठा आवाज झाल्याने गैरसमजातून धावपळ सुरु झाली.

  • ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले

  • एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु

  • सकाळी 10.30 च्या वेळी थेट जखमी आणि मृतांचा आकडा समोर आला. तिघांचा मृत्यू.

  • जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

  • काही क्षणांत दुपारी पावणे बाराच्या सुमारास मृतांची संख्या 15 वर पोहोचली.

  • दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मृतांचा आकडा 19 वर पोहोचला

  • 12. 25 मृतांचा आकडा 22 वर


संबंधित बातम्या

एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं?


LIVE : मुंबईत एलफिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी


एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV