‘वर्षा’वर मंत्रिमंडळ विस्ताराची खलबतं, भाजपचे दिग्गज उपस्थित

राज्यातील भाजपच्या दिग्गज दाखल झाले आहेत. त्यांच्यात महत्त्वपर्ण बैठक सुरु आहे.

‘वर्षा’वर मंत्रिमंडळ विस्ताराची खलबतं, भाजपचे दिग्गज उपस्थित

मुंबई : आगामी मंत्रिमंडळ विस्ताराची खलबतं सुरु झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच ‘वर्षा’ बंगल्यावर भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.

राज्यातील भाजपचे दिग्गज नेते दाखल झाले आहेत. त्यांच्यात महत्त्वपर्ण बैठक सुरु आहे.

बैठकीला कोण कोण नेते उपस्थित?  

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे मंत्री आणि नेते ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले आहेत.

मंत्रिमंडळ विस्तार, हिवाळी अधिवेशन, जनतेत वाढत असलेल्या विरोधी वातावरणाचं आव्हान यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.

ठाणे जिल्हापरिषद , राज्यातील पदवीधर मतदार संघाची निवडणूक आणि काही नगरपालिकांच्या पोट निवडणुकीबाबतही आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: State BJP Core committee meeting at CM bungalow latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV