राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर : सूत्र

विशेष म्हणजे, नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरही निर्णय झाला नसल्याची माहिती मिळते आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर : सूत्र

मुंबई : हिवाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काल रात्री भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच 'वर्षा' बंगल्यावर पार पडली.

गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरही निर्णय झाला नसल्याची माहिती मिळते आहे.

बैठकीला कोण कोण नेते उपस्थित? 

मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे मंत्री आणि नेते ‘वर्षा’ बंगल्यावरील बैठकीला उपस्थित होते. काल रात्री उशिरा सुरु झालेली ही बैठक सुमारे तीन तास चालली.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: State Cabinet expansion extend latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV