राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अपंग व्यक्ती, वरिष्ठ नागरिक आणि समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी 11 ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय मुंबई येथे मराठी भाषा भवनाच्या उभारणीसाठी समिती स्थापण्याचा निर्णयही घेण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  1. महाराष्ट्र औद्योगिक धोरण-2013 अंतर्गत एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासंबंधीच्या धोरणामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.

  2. एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात सवलती देण्यात येणार.

  3. अपंग व्यक्ती, वरिष्ठ नागरिक व समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी 11 ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन होणार.

  4. मुंबई येथे मराठी भाषा भवनाच्या उभारणीसाठी समिती स्थापण्याचा निर्णय.

  5. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपटाची नामांकित निर्मिती संस्थेकडून निर्मिती करण्याचा निर्णय.

  6. राज्यातील मंजूर योजनांच्या क्षेत्रात एकात्मिकृत नगरवसाहत प्रकल्प विकसित करण्यासाठी मंजूर विनियमामधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.

  7. महर्षी वेदोध्दारक फाऊंडेशन आणि महर्षी वेदिक हेल्थ प्रा.लि. यांच्या एकात्मिक अतिविशाल प्रकल्पाला प्रायोगिक तत्त्वावर मान्यता.

  8. महाराष्ट्र शासकीय गट अ आणि गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम-2015 मध्ये सुधारणा.

  9. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासह त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यास मान्यता.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: state cabinet important decisions on 14th February 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV