सरकारी नोकऱ्यांमध्ये राज्य सरकारकडून 30 टक्के कपातीची शक्यता

सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. यामुळे जवळपास साडेपाच लाख पदं रिकामी होणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मात्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मात्र नाराजीचं चित्र दिसून येत आहे.

सरकारी नोकऱ्यांमध्ये राज्य सरकारकडून 30 टक्के कपातीची शक्यता

मुंबई : सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. यामुळे जवळपास साडेपाच लाख पदं रिकामी होणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या शक्यतेमुळे मात्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मात्र नाराजीचं चित्र दिसून येत आहे.

सातव्या वेतन आयोगामुळे आधीच राज्याच्या तिजोरीवर मोठा बोजा पडत आहे. त्यातच संगणकीकरण आणि आऊटसोर्सिंगमुळे मनुष्यबळाची गरजही कमी झाली आहे. तसंच काळाच्या ओघात अनेक पदं कालबाह्य ठरली आहेत, तर काही कामांचे स्वरुप बदलल्यानं नव्या पदांच्या निर्मितीची गरज असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

राज्य सरकारच्या या नव्या निर्णयाच्या शक्यतेमुळे मात्र या निर्णयामुळे सरकारी नोकरदारांमध्ये अस्वस्थता आणि नाराजीचं वातावरण पसरलं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: state govts new descision about 30 percent cut in employees latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV