मुंबई विमानतळावरील एन्ट्री फी दहा दिवसात बंद करा : शिवसेना

Stop collecting entry fees within 10 days on Airport, Shivsena writes to GVK latest news update

मुंबई : मुंबई विमानतळावर प्रवेश शुल्क वसुलीबाबत एबीपी माझाच्या बातमीनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. दहा दिवसात टोल वसुली बंद करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करु, असा इशारा शिवसेनेने एअरपोर्ट ऑपरटिंग कंपनी जीव्हीकेला दिला आहे.

काय आहे प्रकरण?
मुंबई विमानतळ परिसरात जर तुम्ही प्रवेश केला तर प्रत्येक फेरीवर एन्ट्री फीच्या नावाखाली 130 रुपये वसूल केले जातात. त्यासाठी तुम्हाला पार्किंग करायचीही गरज नाही. आत शिरताच तुमच्यावर टोलसक्ती लागू होते. मात्र टोल मागणाऱ्याकडे पावती पुस्तकाशिवाय कुठलंच उत्तर नसतं.

नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची लूट
संपूर्ण देशात फक्त इथेच एअरपोर्ट ऑथरिटी आणि सिव्हिल एव्हिएशनचे नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची रोज लाखोंना लूट होते, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विश्वास भांबुरकर यांनी केला आहे.

आरोपांवर GVKचं म्हणणं काय?
– मुंबई विमानतळ अतिसंवेदनशील आहे. वाहनांच्या गर्दीमुळेच खासगी वगळता इतर वाहनांवर एन्ट्री टोल घेतला जातो.

– एअरपोर्ट ऑथरिटी आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या करारानुसार टोल दर ठरवण्याचे सर्वस्वी अधिकार GVK कडे आहेत

– प्रवाशांसाठी खास इलेव्हटेड रोड बांधला गेला आहे. त्याच्या सेवेसाठी हजारो कर्मचारी असतात. एन्ट्री फीचा पैसा या सर्व देखभालीसाठी दिला जातो.

2014 साली एबीपी माझाच्याट बातमीनंतर सर्वपक्षीय आंदोलन होऊन ही टोलधाड बंद झाली होती. मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी 20 रुपये वाढीव दरानं ती पुन्हा सुरु झाली.

खरंतर या टोल धाडीतून अनेक बड्या धेंडांची हितसंबंध जोपासले जात असल्याची चर्चा आहे. यात कंत्राटदार आणि कमर्शियल कंपन्यांचं फावतं. मात्र सर्वसामान्यांना ही लूट निमूटपणे सहन करण्याशिवाय पर्यायच उतर नाही.

पाहा व्हि़डीओ

First Published:

Related Stories

महिला कैदी मृत्यू प्रकरण : महिला आयोगाकडून सुमोटो तक्रार दाखल
महिला कैदी मृत्यू प्रकरण : महिला आयोगाकडून सुमोटो तक्रार दाखल

मुंबई : मुंबईतल्या भायखळा तुरुंगात महिला कैदी मंजुळा शेट्ये

सदाभाऊ खोत यांची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी?
सदाभाऊ खोत यांची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी?

मुंबई : खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/06/2017

मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची दमदार बॅटिंग, नागपूरमध्ये

मुंबईत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुदत वाढवली!
मुंबईत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुदत वाढवली!

मुंबई : मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची

लवकरच डोंबिवलीतही पासपोर्ट काढता येणार!
लवकरच डोंबिवलीतही पासपोर्ट काढता येणार!

डोंबिवली: कल्याण तालुक्यातील नागरिकांना आता पासपोर्ट काढण्यासाठी

आभाळ फाटलंय, पण ते शिवल्याशिवाय राहणार नाही: मुख्यमंत्री
आभाळ फाटलंय, पण ते शिवल्याशिवाय राहणार नाही: मुख्यमंत्री

मुंबई: राज्याच्या तिजोरीवर कर्जमाफीचा निश्चित भार येणार आहे.  आधीच

पहिल्याच पावसात 23 लाखाच्या रस्त्याची दुर्दशा!
पहिल्याच पावसात 23 लाखाच्या रस्त्याची दुर्दशा!

वसई: वसईमध्ये पहिल्याच पावसात तेवीस लाख रूपये खर्च करून बांधलेला

30 जूनच्या मध्यरात्री हॉटेल बंद राहणार!
30 जूनच्या मध्यरात्री हॉटेल बंद राहणार!

मुंबई : येत्या शुक्रवारी जर हॉटेलमध्ये जाऊन जेवणाचा प्लॅन आखत असाल

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक सुरु
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक सुरु

पुणे: मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील पहिला ब्लॉक संपला आहे.

दंड टाळण्यासाठी 30 फूट उंच मेट्रो स्टेशनवरुन तरुणाची उडी
दंड टाळण्यासाठी 30 फूट उंच मेट्रो स्टेशनवरुन तरुणाची उडी

मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्या एका तरुणाने दंडाची रक्कम