सहावीतल्या विद्यार्थ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

अभिषेक तिथे कसा आला, त्याची हत्या का व कोणी केला, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. घटनास्थळी पोलिसांना व्यसनासाठी वापरले जाणारे थिनरसारख्या काही गोष्टी आढळून आल्या असून पोलिसांनी या सर्व दिशेने तपास सुरु केला आहे.

सहावीतल्या विद्यार्थ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

यवतमाळ : कालपासून बेपत्ता असलेल्या यवतमाळ शहराच्या सुरजनगर भागात राहणाऱ्या 13 वर्षीय अभिषेक दीपक टेकाम या मुलाचा आज मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यवतमाळ शहरातील सूरज नगर  परिसरातील सागवान जंगल परिसरात एका निर्जन स्थळी त्याचा मृतदेह आढळला आहे.

अभिषेकची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सहावी इयत्तेत शिकणारा अभिषेक टेकाम हा कालपासून घरुन बेपता होता. शिकवणीला गेला होता. मात्र उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या पालकांची चिंता वाढली.

पालकांनी शिकवणी परिसरात मित्र, नातेवाईकांकडे विचारपूस केली आणि सर्वत्र शोधाशोध केली. मात्र अभिषेकचा काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर  त्याचे वडील दीपक टेकाम यांनी यवतमाळच्या वडगावरोड पोलिसात अपहरण बाबत तक्रार दाखल केली.

आज दुपारी शहरातील सुरजनगरातील निर्जन असलेल्या सागवान जंगल परिसरात पोलिसांना एका लहान मुलांचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, तो मृतदेह अभिषेकचा असल्याचे निष्पन्न झाले.

अभिषेक तिथे कसा आला, त्याची हत्या का व कोणी केला, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. घटनास्थळी पोलिसांना व्यसनासाठी वापरले जाणारे थिनरसारख्या काही गोष्टी आढळून आल्या असून पोलिसांनी या सर्व दिशेने तपास सुरु केला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV