VIDEO: ‘मौत का कुआँ’मध्ये स्टंट गर्लचा अपघात, थरार कॅमेऱ्यात कैद

कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावरील जत्रेत ‘मौत का कुआँ’मध्ये स्टंट करत असताना एका तरुणीचा भीषण अपघात झाल्याचं नुकतंच समोर आलं आहे.

VIDEO: ‘मौत का कुआँ’मध्ये स्टंट गर्लचा अपघात, थरार कॅमेऱ्यात कैद

कल्याण : जत्रेत ‘मौत का कुआँ’मध्ये स्टंट करत असताना एका तरुणीचा भीषण अपघात झाल्याचं नुकतंच समोर आलं आहे. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील जत्रेत ही घटना घडल्याचं समजतं आहे.

नवरात्रौत्सवानिमित्त कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ सध्या मोठी जत्रा भरली आहे. त्यानिमित्तान इथं ‘मौत का कुआँ’ देखील सुरु होतं. यावेळी स्टंट करत असताना स्टंट वुमनला कारची जोरदार धडक बसली आणि ती तात्काळ खाली कोसळली. दरम्यान, या भयंकर अपघाताची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

काल (सोमवार) रात्री ‘मौत का कुआँ’ प्रकारात शिवानी गजभिये ही महिला स्टंट करत होती. त्यावेळी स्टंट करत असताना तिचा पाय अचानक रेलिंगमध्ये अडकला आणि ती तिथंच अडकली. दरम्यान, मागून येणाऱ्या कारनं शिवानीला जोरदार धडक दिली. त्या धडकेनं शिवानी 15 ते 20 फूट खाली कोसळली.

या दुर्घटनेनंतर शिवानीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

VIDEO : (ही दृश्यं तुम्हाला विचलित करु शकता)

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV