'तेजाब'मधील अनिल कपूरचा आवाज माझा: सुदेश भोसले

By: | Last Updated: > Monday, 31 October 2016 9:57 PM
sudesh bhosle on majha katta

मुंबई: अनिल कपूर यांच्या ‘तेजाब’ या चित्रपटातील आवाज आपला असल्याचं, गुपित सुप्रसिद्ध गायक आणि मिमिक्री आर्टिस्ट सुदेश भोसले यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. तसेच त्यांनी आपल्या कारकीर्दीतील अनेक चढ-उताराचे क्षणही सांगितले.

भोसले म्हणाले की, ”सेन्सॉरसाठी एन. चंद्रा यांना कॉपी पाठवायची होती. पण त्यावेळी अनिल कपूर मुंबईत नव्हते. त्यामुळे चंद्रा यांनी चित्रपटातील अनिल कपूरांचा आवाजातील संवाद माझ्या आवाजात डबिंग करुन घेतले, आणि ती कॉपी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवली. नंतर जेव्हा अनिल कपूर मुंबईत परतले, तेव्हा त्यांच्याच आवाजातूनही चित्रपटाचे पुन्हा डबिंग झाले. पण या दरम्यान जुन्या तयार असलेल्या 25 प्रिंट इतर कॉपींसोबत एकत्रित झाल्या. त्यात पाठवणाऱ्यालाही न समजल्याने माझ्या आवाजातील 25 कॉपी वितरीत झाल्या.”

आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्याविषयी सांगताना भोसले  म्हणाले की, ”माझं पेंटिंग ही चांगलं आणि गाणंही चांगलं होतं. त्यामुळे शालेय जीवनात अनेक चित्रपटांचे पोस्टर्स मी केली. वयाच्या 14 व्या वर्षी राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांच्या ‘प्रेमनगर’ या चित्रपटाचे मी काढलेले पोस्टर्स सर्वत्र झळकले.”

तसेच मिमिक्रीचा सर्वात पहिला प्रयोग महाविद्यालयीन जीवनात केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र 1982 मध्ये मेलेडी मेकर्समधून व्यावसायिक मिमिक्री आर्टिस्ट म्हणून कारकीर्द सुरु केली.

याशिवाय संजीव कुमार यांच्या निधनानंतरचे त्यांचे जवळपास 5 चित्रपट आपल्या आवाजात डबिंग केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मिमिक्री आर्टिस्ट म्हणून आपल्या आवाजाची अनेकांना ओळख नसल्याबद्दलची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.

First Published:

Related Stories

... म्हणून आमीर खानने नाक आणि कान टोचलं!
... म्हणून आमीर खानने नाक आणि कान टोचलं!

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या दंगल

'ट्युबलाईट'नंतर सलमान-शाहरुख मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र?
'ट्युबलाईट'नंतर सलमान-शाहरुख मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र?

मुंबई : शाहरुखसोबत पूर्ण लांबीचा चित्रपट करण्याचा कुठलाही इरादा

मालेगावात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले!
मालेगावात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले!

मालेगाव : अभिनेता सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ सिनेमाचा शो सुरु

‘वळू’ सिनेमातील ‘डुरक्या’चा मृत्यू
‘वळू’ सिनेमातील ‘डुरक्या’चा मृत्यू

सांगली : संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवलेल्या ‘वळू’

शिवगामीसाठी केलेल्या मागण्या उघड, श्रीदेवी राजमौलींवर नाराज
शिवगामीसाठी केलेल्या मागण्या उघड, श्रीदेवी राजमौलींवर नाराज

मुंबई : बहुचर्चित बाहुबली चित्रपटात भूमिका करण्यासाठी हृतिक रोशन

जन्मदिन विशेष : आर डी बर्मन यांना 'पंचम' हे नाव कसं मिळालं?
जन्मदिन विशेष : आर डी बर्मन यांना 'पंचम' हे नाव कसं मिळालं?

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील जादूगार संगीतकार आर. डी. बर्मन

'दंगल'ची जगभरात 2000 कोटींची कमाई
'दंगल'ची जगभरात 2000 कोटींची कमाई

मुंबई : अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’चा जगभरात धुमाकूळ सुरु आहे.

VIDEO : काजोल-धनुषची जुगलबंदी, 'व्हीआयपी 2' चा ट्रेलर
VIDEO : काजोल-धनुषची जुगलबंदी, 'व्हीआयपी 2' चा ट्रेलर

मुंबई : काजोल आणि धनुष यांची भूमिका असलेल्या ‘वेलै इल्ला

मॉडेल कृतिका चौधरीच्या घटस्फोटित पतीला अटक
मॉडेल कृतिका चौधरीच्या घटस्फोटित पतीला अटक

मुंबई : दोनच आठवड्यांपूर्वी हत्या झालेली नवोदित मॉडेल कृतिका चौधरी