शिफू सनकृतीची फूस लावणाऱ्या सुनील कुलकर्णीला बेड्या

शिफू सनकृतीची फूस लावणाऱ्या सुनील कुलकर्णीला बेड्या

मुंबई : तरुणाईला शिफू सनकृतीनं घेरल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. शिफू सनकृतीची फूस लावून तरुणींना अंमली पदार्थ आणि सेक्स रॅकेटमध्ये ओढलं जातं. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे.

मालाडमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींच्या दाव्यांमुळे मुंबई हायकोर्ट सुन्न झालं आहे. 23 वर्षांची सीता एलएलएमच्या शेवटच्या वर्षाला आहे. तर 21 वर्षाची गीता आर्किटेक्टच्या तिसऱ्या वर्षाला. दोन्ही मुलींना शिफू सनकृतीचा प्रचारक सुनील कुलकर्णीनं फूस लावल्याचा आरोप आहे.

इतकंच नाही तर दोन्ही मुलींना ड्रग्ज आणि सेक्स रॅकेटमध्ये फसवल्याचंही आई-वडिलांचं म्हणणं आहे. प्रकरण हायप्रोफाईल आहे. मुलींचे वडील सीए आहेत. दोघींनी घर सोडल्यानंतर सुनील कुलकर्णीकडे आसरा घेतला. मुलींना घरी परत आणण्यासाठी आई-वडिलांनी पोलिसात धाव घेतली. पण मुली सज्ञान असल्यानं काहीच झालं नाही.

अखेर आई-वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि अनुजा प्रभूदेसाईंनी पोलिसांना झापल्यानंतर सुनील कुलकर्णीविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.

सुनील कुलकर्णीनं मुलींना सेक्स रॅकेट आणि ड्रग्जच्या अंमलाखाली आणल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पण मुलींनी उलट आई-वडिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.

शिफू सनकृतीचं गौडबंगाल आपल्या समाजाला नीटसं माहिती नाही. स्वत:चा मेंदू आणि मज्जासंस्थांचा एकमेकांशी संवाद घडवण्याची ही प्रक्रिया आहे. माणसाच्या मनातील जनावर शोधून त्याला भावनात्मक पद्धतीनं उघडं करण्याचं साधन आहे. काहींच्या मते यासाठी लैंगिक आणि शारीरीक संबंधांचाही वापर केला जातो.

सुनील कुलकर्णी शिफू सनकृतीचा प्रचार, प्रसार करतो, फेसबुकवर त्याचं एक पेजही आहे. 23 वर्षाची सीता आपल्या मैत्रिणीच्या माध्यमातून सुनील कुलकर्णीच्या संपर्कात आली. आणि आता ती आपल्या आई-वडिलांनाच दुश्मन समजू लागली.

दोन्ही मुलींच्या सांगण्यात एक संगती आहे, आणि ती आई-वडिलांनी केलेल्या छळाची. त्यामुळे प्रकरण नाजूक झालं आहे. आपल्या अंगावर बसून मारहाण होत असल्याचा आरोप धाकटीने केला आहे, तर घरी न परतण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

शिफू सनकृतीचा पर्दाफाश झाल्यानंतर आणखी दोन पालकांनी त्यांच्या मुलांना कुलकर्णीनं फूस लावल्याचा आरोप करत पोलीस ठाणं गाठलं आहे.

विशीबाविशीत मुलांनी बंडाचं निशाण फडकावणं कुठल्याही कुटुंबाला नवीन नाही. पण घरातले रुसवे-फुगवे वाद कोर्टापर्यंत क्वचित जातात. आता त्याला शिफू सनकृतीच्या वादानं घेरलं आहे. त्यामुळे सत्य बाहेर येण्यासाठी नीट पोलीस तपास व्हायला हवा.

First Published:

Related Stories

मुंबई उपनगरांमध्ये पावसाची दमदार बॅटिंग
मुंबई उपनगरांमध्ये पावसाची दमदार बॅटिंग

पालघर : गेल्या 24 तासात पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह चांगलाच

पावसाळी वातावरणाचा आनंद वाढवण्यासाठी दादरमध्ये भजी महोत्सवाचं आयोजन
पावसाळी वातावरणाचा आनंद वाढवण्यासाठी दादरमध्ये भजी महोत्सवाचं...

मुंबई : सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे.

मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाचं दमदार पुनरागमन
मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाचं दमदार पुनरागमन

मुंबई : रविवारी वरुणराजा मुंबईकरांवर मेहेरबान झाला असून, मोठ्या

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील ‘हाईट बॅरिअर्स’ दोन दिवसात तुटले!
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील ‘हाईट बॅरिअर्स’ दोन दिवसात तुटले!

रायगड : गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर

सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली : रघुनाथदादा
सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली : रघुनाथदादा

मुंबई : राज्य सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी केली असली, तरी शेतकरी

शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी
शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी

मुंबई : राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची

भायखळा जेलमध्ये महिला कैद्याचा संशयास्पद मृत्यू
भायखळा जेलमध्ये महिला कैद्याचा संशयास्पद मृत्यू

मुंबई: भायखळा जेलमधे एका महिला कैद्याच्या मृत्यूनंतर इतर महिला

दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार : सूत्र
दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार : सूत्र

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारचा प्लान

राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प, त्यांचा उपयोग शून्य: राज ठाकरे
राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प, त्यांचा उपयोग शून्य: राज ठाकरे

मुंबई: ‘राष्ट्रपती फक्त रबर स्टॅम्प आहे, त्यांचा देशाला कधीच फायदा

शेतकरी कर्जमाफीची मर्यादा 1 लाखाऐवजी 2 लाख करा, उद्धव ठाकरेंची सूचना
शेतकरी कर्जमाफीची मर्यादा 1 लाखाऐवजी 2 लाख करा, उद्धव ठाकरेंची सूचना

मुंबई : शेतकरी कर्जमाफीची मर्यादा 1 लाखावरून 2 लाख करा अशी मागणी