भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती.... : सुप्रिया सुळे

"खोट्या डरकाळ्या फोडून सरकारमध्ये राहण्याचं शिवसेनेचं प्रेम कमी होत नाही. शिवसेनेला सर्वसामान्य गरीब माणसाचं प्रेम नाही, हे त्यांच्या सगळ्याच कृतीतून दिसतंय. भाजप जर घोटाळेबाज असेल, तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं.", असा घणाघातही सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर केला.

भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती.... : सुप्रिया सुळे

मुंबई :  जाहिरताबाजीने काही होणार नाही. कामाला लागा आणि जाहिरातीचा पैसा गरीब माणसांना द्या, दोन आशीर्वाद मिळतील, असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर निशाणा साधला. त्यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली.

सरकारच्या जाहिरातबाजीवर जोरदार टीकास्त्र

"भाजप-शिवसेनेच्या सरकारला हात जोडून माझी नम्र विनंती आहे की, जाहिरातबाजीचे पैसे कृपा करुन बंद करा. कामाला लागा. ते पैसे गरीब शेतकऱ्याला, आमच्या अंगणवाडी सेविकेला, रस्त्यांसाठी आणि विकासकामांसाठी ठेवा. जाहिरातबाजी करुन काहीही होणार नाही. आज गरीब माणसाला त्या निधीची गरज आहे. सिलेंडरची सबसिडी वाढवा किंवा गरीब महिलांना द्या. कर्जमुक्त करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांना द्या, चांगला हमीभाव द्या. जाहिरातबाजीवरच्या खर्चातला निधी जर गरीब माणसाला दिलात, तर तुम्हाला दोन चांगले आशीर्वाद मिळतील.", असे खासदार सुप्रिया सुळेंनी हात जोडून भाजप-शिवसेनेला म्हटले.

शिवसेनेचा भ्रष्टाचाराला पाठिंबा आहे का?

"भाजप आणि शिवसेना एका सरकारमध्ये काम करतात. काल शिवसेनेने 'घोटाळेबाज भाजप!' नावाची एक पुस्तिका काढली आहे. जर एवढे घोटाळेबाज भाजप असेल, मग शिवसेनेची क्रेडिबिलिटी काय? तुम्ही करप्शनला सपोर्ट करता? हा प्रश्न मला शिवसेनेला विचारायचा आहे. तुम्ही सत्तेसाठी इतके स्वत:ला कॉम्प्रमाईज करता? तुम्ही भ्रष्टाचारालापण सपोर्ट करता?", अशा प्रश्नांची सरबत्ती सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर केली.

सेनेच्या खोट्या डरकाळ्या!

"खोट्या डरकाळ्या फोडून सरकारमध्ये राहण्याचं शिवसेनेचं प्रेम कमी होत नाही. शिवसेनेला सर्वसामान्य गरीब माणसाचं प्रेम नाही, हे त्यांच्या सगळ्याच कृतीतून दिसतंय. भाजप जर घोटाळेबाज असेल, तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं.", असा घणाघातही सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर केला.

सुप्रिया सुळेंच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे :

- खड्ड्यांबाबत चंद्रकांतदादांच्या 18 डिसेंबरच्या डेडलाईनचं स्वागत - सुप्रिया सुळे
- सरकार जाहिराती उत्तम करतंय, अतिशय सुंदर - सुप्रिया सुळे
- सरकार किती सफाईने खोटं बोलतं, याची खरंतर दाद दिली पाहिजे - सुप्रिया सुळे
- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावामुळे राज्य सरकारने कर्जमाफी केली - सुप्रिया सुळे
- सरकारमध्ये कुणीही गंभीर नसल्यासारखं वाटू लागलंय - सुप्रिया सुळे
- निवडणूक जिंकणं, ही एक गोष्ट आणि प्रशासनात काम करणं, ही वेगळी गोष्ट - सुप्रिया सुळे
- सरकारला डायलॉग करायचा नाही, हे सातत्याने दिसतंय - सुप्रिया सुळे
- एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच आम्ही कायम उभे राहणार - सुप्रिया सुळे
- 'घोटाळेबाज भाजप' पुस्तिका काढूनही शिवसेना सत्तेत का? शिवसेना भ्रष्टाचाराला सपोर्ट करते का? - सुप्रिया सुळे
- पवारसाहेबांचे सगळ्याच पक्षांशी चांगले संबंध - सुप्रिया सुळे
- फेरीवाल्यांच्याही पोटा-पाण्याचा प्रश्न आहे, तेही गरीब आहेत, मारहाण करुन प्रश्न सुटणार नाहीत - सुप्रिया सुळे
- भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती, कामं करा, जाहिरताबाजीने काही होणार नाही - सुप्रिया सुळे

VIDEO : सुप्रिया सुळेंची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Supriya Sule criticized Shivsena and BJP latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV