मुंबईत लष्कर-ए-तोयबाचा संशयित दहशतवादी अटकेत

लष्कर-ए-तोयबच्या एका संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे.

मुंबईत लष्कर-ए-तोयबाचा संशयित दहशतवादी अटकेत

मुंबई : लष्कर-ए-तोयबाच्या एका संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने या दहशतवाद्याला पकडलं आहे. सलीम खान असे या संशयित दहशतवाद्याचं नाव आहे.

सलीम खान हा उत्तर प्रदेशातील हाथ गावातील रहिवाशी आहे. फैजाबादमधून पकडण्यात आलेल्या आयएसआय एजंटचा सलीम हा फायनान्सर होता.

सैन्याची माहिती पुरवण्याचं काम करणाऱ्यांना आर्थिक पुरवठा सलीम करायचा. लष्कर-ए-तोयबाच्या मुजफ्फराबाद कॅम्पमध्ये सलीमने ट्रेनिंग घेतलं होतं.

सलीमकडून आणखी माहिती मिळण्यास एटीएसला मदत होणार आहे. आणखी किती एजंट सलीमसोबत काम करत आहेत, याचीही माहिती मिळेल.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV