अभिनेत्री कृतिका चौधरी हत्या प्रकरणाचं गूढ वाढलं!

By: | Last Updated: > Thursday, 15 June 2017 1:01 PM
अभिनेत्री कृतिका चौधरी हत्या प्रकरणाचं गूढ वाढलं!

मुंबई : अभिनेत्री कृतिका चौधरी हत्या प्रकरणाचं गूढ आता वाढत चाललं आहे. कृतिकाचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडल्यानं हत्येपूर्वी तिच्यावर जबरदस्ती झाली असावी, तसेच तिची हत्या 7 ते 8 जूनच्या दरम्यान झाली असावी, असा संशय वर्तवण्यात येतो आहे. या पार्श्वभूमीवर 7 आणि 8 तारखेच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

ज्या तरुणाशी तिचं शेवटचं बोलणं झालं होतं. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरु झाली आहे. कृतिकाच्या कॉल लिस्टमधील अनेक जण ड्रग्स घेत असल्याचं समोर आल्यानं याही पैलूचा तपास केला जातो आहे. हत्येप्रकरणी पोलिसांना पुरावा मिळाला असून, दोन दिवसात हत्येचा उलगडा होईल असा दावा पोलिसांकडून करण्यात येतो आहे.

कृतिका सिनेक्षेत्रात आपली स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. आपल्या ग्लॅमरस लूक आणि अभिनयाच्या जोरावर कृतिका यशाच्या पायऱ्या चढत होती. मात्र, एखादा मोठा ब्रेक मिळण्याआधीच मृत्यूने तिचे स्वप्न धुळीस मिळवले.

कृतिका मुंबईतील अंधेरीत भैरवनाथ सोसायटीत पाचव्या मजल्यावर राहत होती. अगदी हसत-खेळत जगणारी कृतिका अचानक गायब झाली. फ्लॅटही बंद होता. मात्र, ती बेपत्ता झाल्याच्या पाच-सहा दिवसांनंतर बंद फ्लॅटमधून वास येऊ लागला आणि शेजाऱ्यांना शंका आली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर कृतिकाच्या हत्येची घटना समोर आली.

दरम्यान, पोलिसांनी दावा केला आहे की, दोन दिवसात कृतिकाच्या हत्येचा उलगडा होईल. त्यामुळे येत्या दोन दिवसात कृतिकाचा मारेकरी कोण आणि हत्येमागचं कारणं काय, हे जगासमोर येईल, हे नक्की.

First Published:

Related Stories

हरियाणाच्या मनुषी छिल्लरला 'फेमिना मिस इंडिया'चा किताब
हरियाणाच्या मनुषी छिल्लरला 'फेमिना मिस इंडिया'चा किताब

मुंबई : हरियाणाची मनुषी छिल्लर 2017 ची ‘फेमिना मिस इंडिया’ ठरली आहे.

नीरजा भानोतचं कुटुंबीय 'नीरजा' चित्रपट निर्मात्यांविरोधात कोर्टात
नीरजा भानोतचं कुटुंबीय 'नीरजा' चित्रपट निर्मात्यांविरोधात कोर्टात

नवी दिल्ली : दिवंगत एअर हॉस्टेस नीरजा भानोतचे कुटुंबीय राष्ट्रीय

अभिनेता रवी तेजाच्या भावाचा अपघातात मृत्यू
अभिनेता रवी तेजाच्या भावाचा अपघातात मृत्यू

हैदराबाद : तलंगणामध्ये हैदराबादजवळील शम्साबादमध्ये झालेल्या

'ट्यूबलाईट'ची पहिल्या दिवसाची कमाई किती?
'ट्यूबलाईट'ची पहिल्या दिवसाची कमाई किती?

मुंबई: सुपरस्टार सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ सिनेमाला म्हणावा

ममता कुलकर्णी फरार घोषित, मुंबईतील घरावर नोटीस
ममता कुलकर्णी फरार घोषित, मुंबईतील घरावर नोटीस

मुंबई : दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री ममता

एक वर्षाने सलमानचं दर्शन, 5 हजार 550 स्क्रीन्सवर ट्युबलाईटचा उजेड
एक वर्षाने सलमानचं दर्शन, 5 हजार 550 स्क्रीन्सवर ट्युबलाईटचा उजेड

मुंबई : ‘बाहुबली 2’ च्या भन्नाट यशानंतर आता सलमान खानच्या

रितेशच्या सिनेमात भूमिकेचं आमिष, ठकसेनाकडून 9 लाखांचा गंडा
रितेशच्या सिनेमात भूमिकेचं आमिष, ठकसेनाकडून 9 लाखांचा गंडा

नाशिक : सिनेमात काम मिळवून देण्याच्या आमिषानं अनेकांना गंडवणाऱ्या

अमिताभ यांनी GSTचा प्रचार करु नये: संजय निरुपम
अमिताभ यांनी GSTचा प्रचार करु नये: संजय निरुपम

मुंबई: आजपासून बरोबर आठ दिवसांनी प्रत्येकाचं बजेट नक्कीच बदलणार

कोण शाहरुख? सरफराजच्या लोकप्रियतेवरुन चाहत्याचा माज
कोण शाहरुख? सरफराजच्या लोकप्रियतेवरुन चाहत्याचा माज

मुंबई : पाकिस्तानी संघाने टीम इंडियाचा पराभव करुन चॅम्पियन्स

अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेची कारवाई
अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेची कारवाई

मुंबई : मुन्नाभाई सीरिजमधील ‘सर्किट’ या व्यक्तिरेखेमुळे