दिवाळीनिमित्त ठाण्यात चक्क 12 हजार किलोची 'सुवर्ण मिठाई'

ठाण्यातील प्रसिद्ध प्रशांत कॉर्नर मिठाई सेंटरमध्ये ही सोन्याची मिठाई मिळत आहे. या मिठाईचा दर 12 हजार रुपये प्रती किलो असून, अस्सल सुका मेवा आणि त्यावर सोन्याचा वर्ख असं या मिठाईचं स्वरुप आहे.

दिवाळीनिमित्त ठाण्यात चक्क 12 हजार किलोची 'सुवर्ण मिठाई'

ठाणे : दिवाळीसाठी घराघरात फराळ बनवण्याची तयारी सुरु असताना, मिठाईची दुकानंही आता सज्ज झाली आहेत. ठाण्यातील एका मिठाई दुकानात चक्क 12 हजार रुपये प्रती किलोने सुवर्ण मिठाई विक्रीसाठी उपलब्ध आहे.

ठाण्यातील प्रसिद्ध प्रशांत कॉर्नर मिठाई सेंटरमध्ये ही सोन्याची मिठाई मिळत आहे. या मिठाईचा दर 12 हजार रुपये प्रती किलो असून, अस्सल सुका मेवा आणि त्यावर सोन्याचा वर्ख असं या मिठाईचं स्वरुप आहे.

ही सोन्याची मिठाई तितक्याच उंची आणि सुंदर मिठाई बॉक्समध्ये बांधून दिली जात आहे.

सध्या दिवाळीच्या निमित्ताने आप्तांना भेट देण्यासाठी मिठाईची खरेदी केली जाते. त्यामुळे ही 12 हजारांची मिठाई भेट म्हणून देणं शक्य नसलं, तरी बघायला म्हणूनही या दुकानात मोठी गर्दी होत आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV