कुठल्याही दबावाशिवाय अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा : उद्धव ठाकरे

‘कोणत्याही बड्या नेत्याचा मुलाहिजा न ठेवता, दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर आयुक्तांनी कारवाई करावी.’

कुठल्याही दबावाशिवाय अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा : उद्धव ठाकरे

मुंबई : ‘कोणत्याही बड्या नेत्याचा मुलाहिजा न ठेवता, दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर आयुक्तांनी कारवाई करावी.’ असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयुक्तांना दिला आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘आयुक्तांनी कोणाचाही दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी. शिवसेना त्यांच्या सोबत असेल. फक्त बांधकाम अधिकृत आहे का अनधिकृत याची खातरजमा करावी.' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

कमला मिल दुर्घटनेच्या एकच दिवस आधी आदित्य ठाकरे कमला मिल इथे गेले होते. यावरुन विरोधकांनी टीकाही केली होती. यालाच आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. ‘कमला मिल दुर्घटनेआधी आदित्य कमला मिल इथे गेले होते असं सांगता, मग मंत्रालयाला आग लागली होती त्याच्याआधी मुख्यमंत्रीही तिथे होते. त्यामुळे असे आरोप करण्यात काहीही अर्थ नाही.’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपला देखील टोला हाणला. ‘कमला मिल प्रकरणात पब चालकांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर करावं लागतं हा म्हणजे कहरच झाला. इनाम लावायला ते दहशतवादी आहेत का?, जर पबचे मालक अद्याप सापडत नसतील तर पोलीस खातं  नेमकं काय करतंय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘कोरेगाव-भीमा घटनेबाबत नंतर बोलेन’

याचवेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि त्यानंतरच्या महाराष्ट्र बंदबाबत त्यांची प्रतिक्रियाही विचारली. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत आपण आज बोलणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, उद्धव ठाकरे मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आज (शनिवार) शिवाजी पार्कवर गेले होते. त्यानंतर शिवसेना भवन येथे डॉ. विजय ढवळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे हस्ते झाले.

संंबंधित बातम्या :

आयुक्त अजॉय मेहतांची नार्को टेस्ट करण्यात यावी : मनसे

कमला मिलमधील ‘ते’ हॉटेल शंकर महादेवनच्या मुलाचं

‘मी परवाच इथे आलो होतो, तेव्हाच आगीची भीती व्यक्त केली होती’

कमला मिल घटनेदिवशी माझ्यावर नेत्यांकडून दबाव : बीएमसी आयुक्त


'मोजोस बिस्ट्रो मधल्या शेगडीमुळेच कमला मिल्स कंपाऊंडमध्ये अग्नितांडव'

कमला मिल आग : '1 अबव्ह' हॉटेलच्या दोन मॅनेजरना अटक


कमला मिल आग : '1 अबव्ह'च्या मालकांच्या काकाविरोधात गुन्हा


मुंबईतील अग्नितांडवाला ठाकरे कुटंबीय जबाबदार : नितेश राणे


अपघात नव्हे हत्या, कमला मिलच्या आगीत 14 निष्पापांचा मृत्यू


कमला मिल आग : तीन आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस


बीएमसीची मोजोस् बिस्त्रो आणि 1 Above विरोधात तक्रार


अग्नितांडवानंतर अनधिकृत बांधकामांवर हातोडा, बीएमसीची कारवाई


1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खान


हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्री


कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित


भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील


कमला मिल आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा!


कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!


कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक'


कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर...


कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली


मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू


मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Take action against unauthorized constructions without any pressure said Uddhav Thackeray latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV