भाजप नगरसेवकांना ठाणे मनपा आयुक्त वैतागले

"आईशप्पथ, आता मला ठाण्यात राहण्याची इच्छा नाही," असं म्हणत ठाण्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपली बदली करण्याची मागणी केली आहे.

भाजप नगरसेवकांना ठाणे मनपा आयुक्त वैतागले

ठाणे : "आईशप्पथ, आता मला ठाण्यात राहण्याची इच्छा नाही," असं म्हणत ठाण्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपली बदली करण्याची मागणी केली आहे.

संजीव जयस्वाल ठाणे शहरात आल्यापासून धडाकेबाज कामगिरी केली आहे. रस्ता रुंदीकरण, लेडीज बार आणि अनधिकृत लॉज, हुक्का पार्लर, टेरेस गार्डन हॉटेलवर केलेल्या कारवाईनंतर ते चर्चेत आले आहेत.

त्यांच्या या धडक कारवाईमुळे भाजपचे नेते मिलिंद पाटणकरांसह काही भाजप नगरसेवकांचा संजीव जयस्वाल यांना विरोध होत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजीव जयस्वाल यांचे चांगले संबंध आहेत. तरीही भाजपच्या नगरसेकांना जयस्वाल यांना विरोध आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आपल्या पक्षातील नगरसेवकांचं ऐकणार की, आयुक्तांच्या पाठिशी उभं राहणार? हे पाहणं महत्वाचं आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: thane muncipal corpo
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV