अभिनेत्री भाग्यश्रीच्या सासू-सासऱ्यांना लुटणारे चार वर्षांनी अटकेत

भाग्यश्रीच्या सासू-सासऱ्यांना गुंगीचं औषध देऊन दोघांनी जानेवारी 2014 मध्ये दागिन्यांवर डल्ला मारला होता.

अभिनेत्री भाग्यश्रीच्या सासू-सासऱ्यांना लुटणारे चार वर्षांनी अटकेत

ठाणे : बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनच्या घरात घुसून तिच्या सासू-सासऱ्यांना लुटणाऱ्या चोरांना चार वर्षांनी अटक करण्यात आली आहे. दोघा चोरट्यांकडून 62 हजार रुपये किमतीचे चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

भाग्यश्रीच्या सासू-सासऱ्यांना गुंगीचं औषध देऊन दोघांनी जानेवारी 2014 मध्ये दागिन्यांवर डल्ला मारला होता. या प्रकरणी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने पिंटू हृदयराम निषाद आणि त्रिवेणी उर्फ महेश भुनीलाल निषाद यांना अटक केली.

घरफोडी करणारे अट्टल चोरटे ठाण्यातील वसंत विहार परिसरात आले असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने पोखरण रोड क्रमांक 2, वसंत विहार सर्कलमध्ये सापळा लावून दोन्ही आरोपींना अटक केली.

Bhagyashree in laws loot

अटक केलेल्या चोरट्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे लोखंडी कटावणी, स्क्रू ड्रायव्हर असं घरफोडी करण्याचं साहित्य मिळाले. या चोरट्यांकडून 62 हजार रुपये किमतीचे चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दोघांकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. चार वर्षांपूर्वी भाग्यश्रीच्या घरात केलेल्या चोरीचीही कबुली दोघांनी दिली.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Thane : Thieves who looted actress Bhagyashree’s in laws arrested after 4 years latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV