भोसरी एमआयडीसी प्रकरणावरून एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर

प्रकाश मेहता आणि सुभाष देसाईंवर कारवाईसाठी टाळाटाळ करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी विधानसभेत चांगलंच कोंडीत पकडलं. भोसरी एमआयडीसी प्रकरणावरुन खडसेंचे सरकारला शाल जोडे मारत, भोसरी एमआयडीसीतली 3 एकर जमीन मोकळी करुन देणार का? असा प्रश्न उपस्थित विचारला. खडसेंच्या या प्रश्नामुळे मुख्यमंत्र्यांची चांगलीच पंचाईत झाल्याचं पाहायला मिळालं.

The question of the Eknath Khadse to state government on Bhosari MIDC issue

मुंबई : प्रकाश मेहता आणि सुभाष देसाईंवर कारवाईसाठी टाळाटाळ करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी विधानसभेत चांगलंच कोंडीत पकडलं. भोसरी एमआयडीसी प्रकरणावरुन खडसेंचे सरकारला शाल जोडे मारत, भोसरी एमआयडीसीतली 3 एकर जमीन मोकळी करुन देणार का? असा प्रश्न उपस्थित विचारला. खडसेंच्या या प्रश्नामुळे मुख्यमंत्र्यांची चांगलीच पंचाईत झाल्याचं पाहायला मिळालं.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी 600 एकर जमीन संपादित करण्यात आली. मात्र, शिवसेनेच्या जवळच्या बिल्डरला फायदा मिळावा, यासाठी यातली 400 एकर जमीन देसाईंनी आरक्षित भूखंडातून वगळल्याचा आरोप विरोधकांनी सुभाष देसाईंवर केला आहे.

यावरुनच खडसेंनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. भोसरी एमआयडीसी जमीनीचा उल्लेख करुन खडसे म्हणाले की, ”1967 साली भोसरी एमआयडीसीनं काही एकर जमीन वेस्ट म्हणून घोषित केली. त्यानंतर त्याच्या खरेदी व्यवहारात माझा कोणताही सहभाग नसताना, माझ्यावर कारवाई करण्यात आली. आणि ती जागा मोकळी केल्याचं विधानसभेला सांगितलं होतं. पण सध्या राज्य सरकार इतकंच उदार झालं असेल, तर मग 50  वर्षांपूर्वीची भोसरी प्रकरणातील 3 एकर जमीन आरक्षित भूखंडातून वगळणार का?”

खडसेंच्या या प्रश्नावरुन मुख्यमंत्र्यांची चांगलीच पंचाईत झाली होती. मुख्यमंत्र्यांनी यावर सावध पवित्रा घेत, खडसेंची मागणी निश्चित तपासून पाहिली जाईल, आणि त्यात तथ्य असेल, तर त्यावर कायदेशीर निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

संबंधित बातम्या

आता सुभाष देसाईंच्या राजीनाम्याची मागणी

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:The question of the Eknath Khadse to state government on Bhosari MIDC issue
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

रावतेंबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचा पश्चाताप नाही : हाजी अराफत
रावतेंबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचा पश्चाताप नाही : हाजी अराफत

मुंबई : शिवसेनेच्याच कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचे

फोडाफोडी केली नाही, विश्वासाने 'ते' शिवसेनेसोबत : उद्धव ठाकरे
फोडाफोडी केली नाही, विश्वासाने 'ते' शिवसेनेसोबत : उद्धव ठाकरे

मिरा भाईंदर : आम्ही फोडाफोडी केलेली नाही, लोक विश्वासाने आले आहेत,

मिरा भाईंदर महापालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात, रविवारी मतदान
मिरा भाईंदर महापालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात, रविवारी मतदान

मिरा भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेचा रणसंग्राम शिगेला पोहचला आहे.

विशेष अधिकार नसलेले लोकायुक्त प्रकाश मेहतांची चौकशी करणार
विशेष अधिकार नसलेले लोकायुक्त प्रकाश मेहतांची चौकशी करणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण मंत्री

मीच मुख्यमंत्री, दानवेच प्रदेशाध्यक्ष, फडणवीसांचं स्पष्टीकरण
मीच मुख्यमंत्री, दानवेच प्रदेशाध्यक्ष, फडणवीसांचं स्पष्टीकरण

मुंबई : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावरुन रावसाहेब दानवे

327 गायक, 109 शब्द, प्रत्येकाचा वेगळा नाद, गिनीज बुकमध्ये नोंद
327 गायक, 109 शब्द, प्रत्येकाचा वेगळा नाद, गिनीज बुकमध्ये नोंद

नवी मुंबई: तब्बल 327 गायकांनी एका वेळेस वेगवेगळे शब्द उच्चारत गाणे

मिरा भाईंदरमध्ये मतदार यादीत घोळ, काँग्रेसचा आरोप
मिरा भाईंदरमध्ये मतदार यादीत घोळ, काँग्रेसचा आरोप

मिरा भाईंदर : महापालिकेची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली

अवैध कॉफी शॉपला संरक्षण, हायकोर्टाने सरकारला झापलं
अवैध कॉफी शॉपला संरक्षण, हायकोर्टाने सरकारला झापलं

मुंबई : नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील आणि मुख्यमंत्र्यांचे

झोपेत महिलांचे केस कापण्याचं लोण मुंबईत, 3 महिलांचे केस कापले
झोपेत महिलांचे केस कापण्याचं लोण मुंबईत, 3 महिलांचे केस कापले

मुंबई: उत्तर भारतातील केस कापण्याच्या घटनांचं लोण आता मुंबईतही

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा मुंबई लोकलने प्रवास
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा मुंबई लोकलने प्रवास

मुंबई: येत्या 20 ऑगस्ट रोजी मिरा भाईंदरमध्ये महापालिका निवडणुका होत